Next
‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांना औषधांचे वाटप
BOI
Friday, July 20, 2018 | 04:25 PM
15 0 0
Share this story

इंदापूर : जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना फिनोलेक्स पाइप्स आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने राजगिरा चिक्की, प्रथमोपचार सेवा व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

पुण्यातील फिनोलेक्स पाइप्स व त्यांचे सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने विठूरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांना खाऊ व मोफत औषधोपचारांचे वाटप केले जात आहे. पालखी मार्गावर महत्त्वाच्या असलेल्या इंदापूर या ठिकाणी संस्थांच्या वतीने राजगिरा चिक्की, प्रथमोपचार सेवा व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने वारकऱ्यांवर औषधोपचार केले. या वेळी फिनोलेक्सचे सरव्यवस्थापक अशोक खडके, फिनोलेक्स पाइप्सचे सेल्स मँनेजर कल्याण गोफणे, फिनोलेक्सचे अधिकृत विक्रेते नंदकुमार गुजर, तुषार गुजर आदी उपस्थित होते.

फिनोलेक्स पाइप्सचे चेअरमन प्रकाश छाब्रिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू प्रकाश छाब्रिया यांच्या संकल्पनेतून गेली ३० वर्षे हा उपक्रम चालू आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sakharam Patil About 218 Days ago
Good Initiative
0
0

Select Language
Share Link