Next
रत्नागिरीत १९ डिसेंबरला अभंग गायन स्पर्धा
गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
BOI
Saturday, December 15 | 11:15 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री गगनगिरी महाराज आश्रम आणि स्वराभिषेक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी चार वाजता थिबा पॅलेसजवळील श्री गगनगिरी महाराज आश्रम सभागृहात होईल.

श्री गगनगिरी महाराज आश्रमात दत्तजयंती, गुरुपौर्णिमा या दिवशी आनंद प्रभुदेसाई हे दर वर्षी विनामूल्य गायन सादर करायचे. अगदी आजारपणातही त्यांनी गायनसेवा केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यवर्गाने त्यांचा हा उपक्रम पुढे सुरू ठेवला आहे. प्रभुदेसाई यांनी केलेल्या या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावाने ही स्पर्धा गगनगिरी महाराज आश्रमातर्फे घेण्यात येत आहे.

स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी येथील स्वराभिषेक या संगीतवर्गाने उचलली आहे. रत्नागिरी तालुक्यातील १२ ते २० वयोगटांतील स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येईल. स्पर्धेत फक्त संत रचित अभंग सादर करायचा आहे. यासाठी संगीतसाथीदारांची व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात आली असून, स्वतःचे साथीदारही आणण्यास परवानगी आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात येईल, असे श्री गगनगिरी महाराज आश्रमाचे श्री. पानगले यांनी सांगितले.

स्पर्धेविषयी :
दिवस :
बुधवार, १९ डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : श्री गगनगिरी महाराज आश्रम सभागृह, थिबा पॅलेस, रत्नागिरी.
नावनोंदणी व प्रवेश अर्जासाठी संपर्क :
महेंद्र पाटणकर : ९४०४३ ३१८०२
मंगेश मोरे : ९०११९ १८२८२
ईशानी पाटणकर : ७७२०० ०९४१०
राकेश बेर्डे : ९४२२३ ९२१७८
तन्वी बाणे : ९४२३२ ९७५२५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link