Next
‘सॅमसंग’तर्फे डिजिटल कॅम्पेन
प्रेस रिलीज
Wednesday, September 26, 2018 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : सॅमसंग इंडियाने आपल्या डिजिटल व्हॉइट असिस्टंट बिक्सबीची क्षमता दर्शवण्यासाठी डिजिटल कॅम्पेन सादर केले आहे. एका हृदयस्पर्शी सादरीकरणाद्वारे बिक्सबीची क्षमता प्रेक्षकांसमोर येते आणि थेट हृदयाला भिडते. ही फिल्म मोटर न्यूरॉन डिसीज (एमएनडी)/एएलएस रुग्ण असलेल्या सोनलची (नाव बदललेले आहे) आहे, ज्यांनी आपला आवाज आपल्या मुलीसाठी कायमस्वरूपी जपण्यासाठी ‘सॅमसंग’च्या प्रायोगिक प्रकल्पाला मदत केली.

या कॅम्पेनमध्ये एक प्रेमळ आई दाखवण्यात आली आहे, जिला मोटर न्यूरॉन डिसीज (एमएनडी)/एएलएस आजार झालेला असतो. त्यामुळे तिचा आवाज कायमचा हरपला असतो. शिवाय चालण्या-फिरण्याची क्षमता गेलेली असते; मात्र सॅमसंग आपल्या एआय आधारित बिक्सबी तंत्रज्ञानाच्या मदतीने तिचा आवाज सॅमसंग स्मार्टफोनवर जिवंत ठेवतो. ज्यामुळे तिच्या प्रियजनांना तिचा आवाज ऐकत राहाता येतो.

याबाबत बोलताना सॅमसंग इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी रणविजित सिंग म्हणाले, ‘या प्रकल्पात सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट, बेंगळुरूने (एसआरआय-बी) कोअर स्पीच तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीसोबत काम केले आहे. आम्ही स्वतंत्र आवाज ध्वनीमुद्रित करून टीटीएस (टेक्स्ट टु स्पीच) तंत्रज्ञानाद्वारे अँड्रॉइड ओएसवर (सॅमसंग स्मार्टफोन) त्याची अनुकलूता तपासली. टायझएन ओएसवर (रेफ्रिजरेटर, टीव्ही) त्याची तपासणी सुरू आहे. या टप्प्यामुळे आम्ही ‘आशा एक होप फाउंडेशन’पर्यंत पोहोचलो, जी एमएनडी/एएलएससाठीची भारतातील पहिली नोंदणीकृत एनजीओ आहे. ना- नफा तत्त्वावर चालणारी भारतातील पहिली संस्था मोटर न्यूरॉन डिसीज (एमएनडी) असलेले रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करते. ही संस्था त्यांच्यात आशा व सकारात्मकता निर्माण करून आजारावर मात करण्यास मदत करते.’

‘सॅमसंगमध्ये आम्ही अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी बांधील आहोत. अर्थपूर्ण आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे लोकांच्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही फिल्म ‘सॅमसंग’ कशाप्रकारे अशक्यप्राय वाटणारी गोष्ट एआय व्हॉइस असिस्टंट बिक्सबीच्या मदतीने शक्य करून दाखवत ‘एमएनडी’ झालेल्या आईचा आवाज तिच्या मुलीसाठी जतन करते हे दाखवते,’ असे सिंग यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search