Next
‘रत्नागिरी दिनांक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
BOI
Saturday, November 04 | 04:08 PM
15 0 0
Share this story

दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मान्यवर.रत्नागिरी : दिलीप आडिवरेकर संपादित ‘रत्नागिरी दिनांक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या प्रमुख उपस्थितीत चार नोव्हेंबर रोजी झाले.
 
आडिवरेकर हे मुक्त पत्रकार असून गेली १० वर्षे ते दिवाळी अंक प्रकाशित करत आहेत. या माध्यमातून मान्यवरांचे वेगवेगळ्या  विषयांवरील वैविध्यपूर्ण लिखाण ते वाचकांसमोर आणत आहेत. या वर्षीच्या अंकातही शिक्षण, पर्यटन, राजकारण आदी विषयांवर उत्तम लेख असून, कथा, कविता यांचाही समावेश आहे.

प्रारंभी आमदार साळवी, डॉ. देव यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय साळवी, ज्येष्ठ नाट्यकर्मी अनिल दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, मत्स्य महाविद्यालयाच्या स्वप्नजा मोहिते, अवधूत शिंदे, श्रीमती भिंगार्डे, शिवसेना रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, तेजा मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. देव आणि आमदार साळवी यांनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी आडिवरेकर यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शकील गवाणकर यांनी केले. आडिवरेकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link