Next
‘प्रियजनांवर प्रेम असेल, तर हेल्मेट अवश्य वापरा’
अभिनेत्री राधिका आपटेचा सल्ला
BOI
Friday, February 15, 2019 | 04:57 PM
15 1 0
Share this story

बजाज अलायन्स इन्श्युरन्सच्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठीच्या नव्या ब्रॅंडचे अनावरण करताना संजीव बजाज, राधिका आपटे, डॉ. के. वेंकटेशम आणि तपन सिंघल

पुणे : ‘मी पुण्याची असून, पुण्याविषयी मला नेहमीच प्रेम आहे. मात्र, हेल्मेट न घातल्याने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. हे रोखण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. सुरक्षित प्रवास ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्या प्रियजनांवर प्रेम असेल तर हेल्मेट अवश्य वापरा,’ असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने दिला आहे. 

बजाज अलायन्स जनरल इन्श्युरन्सने ‘केअरिंगली युवर्स’(Caringly Yours) या त्यांच्या नव्या ब्रॅंडचे अनावरण राधिका आपटे हिच्या उपस्थितीत केले. कोरगाव पार्कमधील अतिशय ट्रॅफिकच्या ठिकाणी दीड हजार हेल्मेटचा वापर करून बनविलेली टॅग लाइन प्रसिद्ध करण्यात आली. टॅगलाइन सादर करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ मुद्दाम निवडण्यात आला. ‘जर तुम्ही तुमच्या प्रियजनांवर प्रेम करत असाल, तर हेल्मेट घालून तुमची काळजी दाखवा’ हा संदेश या निमित्ताने देण्यात आला. 

बजाज अलायन्स जनरल इन्श्युरन्सचे अध्यक्ष संजीव बजाज, बजाज अलायन्स जनरल इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघल, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, राधिका यांच्या उपस्थितीत सुरक्षित वाहन चालविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणाऱ्या या होर्डिंगचे अनावरण करण्यात आले.  

बजाज म्हणाले, ‘ग्राहककेंद्री विमा कंपनी ही ओळख होण्याच्या दिशेने बजाज अलायन्स जनरल इन्श्युरन्सची बांधणी करत आहोत. ‘केअरिंगली युवर्स’ या नव्या ब्रँड ओळखीद्वारे आम्ही केवळ हा संदेश पुन्हा सांगत नसून, तो वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहोत.’

सिंघल म्हणाले, ‘मी हे पाहिले आहे की, छोटीशी गोष्टही लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. आम्ही लोकांच्या सुरक्षेची काळजी करतो त्यामुळे आम्हाला असे वाटले, की नव्या ब्रॅंडच्या अनावरणप्रसंगी हेल्मेट घालण्याचे महत्त्व आम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचवावे.’

वेंकटेशम म्हणाले, ‘सर्वाधिक दुचाकी पुण्यात आहेत. हेल्मेट न घातलेल्या व्यक्तीमच रस्ते अपघातांत सर्वाधिक बळी पडतात. वाहन चालविताना हेल्मेट न घातल्याने हे प्रामुख्याने होते. रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागरूकता निर्माण करण्यासाठी बजाज अलायन्सने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे हे पाहून अतिशय आनंद झाला.’

हेल्मेटशिवाय गाडी चालविली म्हणून वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावलेल्यांना बजाज अलायन्स पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने होर्डिंगवरील हेल्मेट मोफत देणार आहे. व्यक्तिशः त्यांच्या घरी जाऊन हे काम केले जाणार आहे.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link