Next
सॅमसंगतर्फे विंड-फ्री एसी दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘सॅमसंग’ कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती करत आहे आणि विविध उत्पादन श्रेणींमध्ये आघाडीच्या स्थानावर आहे. या तिमाहींमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने, सॅमसंगने टिअर टू व ग्रामीण भागावर भर देऊन, आक्रमक वाढ नोंदवली आहे. ग्राहकांसाठी मेक फॉर इंडियाच्या धर्तीवर नावीन्य आणि सक्षम व सुनियोजित चॅनल व वितरण धोरण यामुळे प्रामुख्याने मागणीमध्ये वाढ झाली.   
 
सॅमसंगने नेहमीच ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून अर्थपूर्ण नावीन्याला प्राधान्य दिले आहे आणि प्रोजेक्ट ‘इनक्रेडिबल इंडिया’ हेही याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करण्यासाठी व चांगली उत्पादने तयार करण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी, सॅमसंगच्या इन-फिल्ड रिसर्च टीमने महिलांबरोबर संवाद साधला. 

भारतातील मोठ्या संख्येतील शाकाहारी लोकसंख्येला फ्रीझरचा फारसा वापर करायचा नसतो. सॅमसंगने जगातील पहिला स्मार्ट कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर दाखल करून, भारतातील रेफ्रिजरेशन श्रेणीमध्ये परिवर्तन आणले. यामध्ये कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर आणि कन्व्हर्टिबल ट्विन कूलिंग रेफ्रिजरेटर यांचा समावेश आहे. सॅमसंगच्या कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर श्रेणीने उपयुक्तता जास्तीत जास्त वाढवली, तसेच ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार रेफ्रिजरेटरमध्ये बदल करण्याची सुविधाही दिली. सर्वोत्तम ‘मेक फॉर इंडिया’ नावीन्यामुळे हा ब्रँड कन्व्हर्टिबल फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर सेग्मेंटमध्ये निर्विवादपणे आघाडीवर आहे. 

फाइव-इन-वन कन्व्हर्टिबल रेंजच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, सॅमसंग आता ३५० लीटरपेक्षा कमी क्षमतांमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत आहे व या नावीन्याच्या मार्फत नव्या बाजारपेठा काबीज करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
 
 
रेफ्रिजरेटरव्यतिरिक्त सॅमसंगने एसी श्रेणीमध्येही सक्षम स्थान निर्माण केले आहे. कमी ऊर्जा वापरणाऱ्या उत्पादनांची वाढती गरज विचारात घेता, एअर-कंडिशनर (एसी) खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा इन्व्हर्टर एसीकडे कल वाढतो आहे. इन्व्हर्टर एसींचा बाजार हिस्सा येत्या तीन ते चार वर्षांत लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे. सर्व कंपन्या इन्व्हर्टर तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. भारतात वारंवार वीज जाण्याचे प्रकार व विजेचे वाढते दर विचारात घेता, अशा प्रकारे कल दिसणे स्वाभाविक आहे.
 
या वर्षी, सॅमसंगने इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगची आणखी एक विशेष संकल्पना दाखल केली आहे व त्यामुळे एसीच्या कार्याविषयी ग्राहक काय विचार करतात त्यामध्ये बदल झाला आहे. या नव्या प्रकारच्या इन्व्हर्टर एअर कंडिशनरला विंड-फ्री एसी तंत्रज्ञान म्हणतात. नव्या लाइन-अपमुळे जगातील पहिल्या विंड-फ्री कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, खोलीतील तापमान आरामदायी राखले जाते. त्यातील २१ हजार मायक्रो एअर होल्सद्वारे थंड हवा अलगद सोडली जाते. फास्ट कूलिंग मोडमध्ये आधी तापमान कमी केले जाते व त्यानंतर विंड-फ्री कूलिंग मोड अवलंबला जातो. अशा टू-स्टेप कूलिंग सिस्टीममुळे एकदा इच्छित तापमान साध्य केले की ‘स्टिल एअर’ निर्माण केली जाते. या सुविधेमुळे फास्ट कूलिंग मोडच्या तुलनेत विजेचा वापर ७२ टक्क्यांपर्यंत कमी केला जातो. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link