Next
‘बुकशेल्फ’च्या वर्षपूर्तीनिमित्त परिसंवाद
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 03:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पुस्तकांविषयी कुतूहल जागवणाऱ्या आणि पुस्तकाच्या दुनियेतल्या किस्से कहाण्या सांगणाऱ्या ‘बुकशेल्फ’ या युट्युब चॅनेलच्या वर्षपूर्तीनिमित्त आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त २४ एप्रिल रोजी मुंबईमध्ये चित्रपटविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिनेमा हा केवळ मानवी आयुष्याचाच नव्हे, तर वर्तमानाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्या सिनेमाचा जनमानसाशी, त्यांच्या भावविश्व आणि आयुष्याशी असलेला बंध उलगडून सांगणारा ‘तुमच्या आमच्या जगण्यातला सिनेमा’ हा कार्यक्रम ‘बुकशेल्फ’कडून आयोजित केला आहे. ह्रदयविकारावर उपचार करणाऱ्या ‘माधवबाग’ या संस्थेच्या सहकार्यातून हा कार्यक्रम होत आहे.

मनस्विनी लता रवींद्रया कार्यक्रमात चित्रपट समीक्षक-लेखक गणेश मतकरी, चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि लेखिक-नाट्य दिग्दर्शक मनस्विनी लता रवींद्र या तीन मातब्बर व्यक्ती सहभागी होणार आहेत. पटकथालेखक अमोल उदगीरकर त्यावेळी संवादकाच्या भूमिकेत असतील. या वेळी ‘बुकशेल्फ’कडून एका आगळ्या-वेगळ्या पुस्तकाचा ‘व्हिडीओ प्रिमियर’ स्क्रीनवर दाखवला जाणार आहे.

सचिन कुंडलकर‘हा कार्यक्रम २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दादर पश्चिमेकडील कबुतरखानाजवळ असलेल्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या दुसऱ्या मजल्यावर होणार असून, तो सर्वांसाठी खुला आहे,’ अशी माहिती ‘बुकशेल्फ’चे संस्थापक संचालक किरण क्षीरसागर यांनी दिली.

गणेश मतकरी‘बुकशेल्फ’ हे यूट्युब चॅनेल २३ एप्रिल २०१७ रोजी ‘जागतिक पुस्तक दिना’चे निमित्त साधून सुरू झाले होते. चॅनेलवरील पहिला व्हिडीओ डॉ. श्रीराम लागू लिखित ‘रूपवेध’ या पुस्तकावर आधारित होता. त्यानंतर ‘बुकशेल्फ’ने वर्षभरात विविध पुस्तके व किस्से, असे एकूण ११ व्हिडीओ सादर केले आहेत. चॅनेलचे आत्तापर्यंत सात हजारांहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : २४ एप्रिल २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : ब्राह्मण सेवा मंडळ, दुसरा मजला, कबुतरखानाजवळ, दादर पश्चिम, मुंबई.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link