Next
‘इंडिया फॅशन वॉक रनवे सनसेट्स’चे चौथे पर्व पुण्यात
प्रेस रिलीज
Wednesday, May 09 | 01:23 PM
15 0 0
Share this story

पुणे :  कल्याणीनगर येथील अॅलेस ब्र्युज अॅन्डे सायडर्स येथे इंडिया फॅशन वॉक रनवे सनसेट्सच्या चौथ्याी पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. डब्ल्यूटीएफ इंडियाद्वारे ऑक्टोबर २०१६मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील डिझायनर्सना तसेच प्रतिथयश डिझायनर्स ना देशांतील मिडिया, खरेदीदार व थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे या उद्देशाने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
याबाबत अधिक माहिती देताना ‘डब्ल्यूएफटी इंडिया’चे संचालक निशांत शेखावत म्हणाले, ‘आयडब्ल्यूएफ रनवे सनसेट्स’ मुळे फॅशन आणि नाईटलाईफचे विश्व एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लवकरच हा उपक्रम भारतातील अन्य टिअर टू शहरांतही लवकरच सुरू करणार आहोत. या ‘रनअवे सनसेट्स’मध्ये  क्यामा बाय रनमीत सचदेवा, गीता आव्हाड कुटूर, क्षमा बाय पुनित खालसा आणि प्रान्ट या मोनिका चोरडिया यांच्या लेबल्सचा समावेश आहे.  

डिझायनर मोनिका चोरडिया म्हणाल्या, ‘ प्रांन्टच्या स्प्रिंग/समर २०१८ कलेक्शन मध्ये अधुनिक भारतातील दोन प्रकारच्या आणि विस्मृतीत गेलेल्या गोष्टीं पुढे आणण्यात येत असून, यामध्ये पश्चिम बंगाल तसेच भुजच्या छोट्या गल्लीतील फॅशन्स जसे, डे वेअर आणि ‘खादी मटका’चे इव्हिनिंगवेअर यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाला विनय अरहाना, आनंद अगरवाल, रिशी सहानी, अभय भुतडा, रोहील शर्मा, विकास भल्ला, आशिष आणि वंदना भुयान, किरण दुबे, मौशमी झवेरी सणस, दर्शना चोरडिया, भविन मेहता,करिश्मा आणि राज बेल्लारा यांनी हजेरी लावली होती.  

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link