Next
‘इंडसइंड’तर्फे व्हॉइस-बेस्ड बँकिंग सेवा दाखल
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 12:11 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : इंडसइंड बँकेने नव्या तंत्रज्ञानांचा वापर करून अत्याधुनिक उत्पादने व सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. ही परंपरा कायम राखत, बँकेने आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) यावर आधारित अॅलेक्सा स्किल ‘इंडसअसिस्ट’ दाखल केले आहे. यामुळे ग्राहकांना अॅमेझॉन एको व अन्य अॅलेक्सा-एनेबल्ड उपकरणांवर विविध प्रकारचे वित्तीय व त्याव्यतिरिक्तचे बँकिंग व्यवहार व्हॉइस-बेस्ड सूचनांद्वारे करता येणार आहेत.

अॅलेक्सा म्हणजे अॅमेझॉनने विकसित केलेली व्हर्च्युअल स्वरूपाची मदत असून, ती म्युझिक प्लेबॅक, कॅबचे बुकिंग, पदार्थ मागवणे, माहिती देणे यासाठी व्हॉइस-आधारित संवाद साधण्यासाठी सक्षम आहे. अॅलेक्सा अॅप वापरून स्मार्टफोनशी बँकेचा तपशील लिंक करण्यासाठी इंडसइंड बँकेच्या ग्राहकांना एकदा नोंदणीप्रक्रिया करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, सर्व ऑथेंटिकेशन व ट्रॅन्झॅक्शन रिक्वेस्ट व्हॉइस-बेस्ड राहतील, त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळेल. ग्राहकांना ‘अॅलेक्सा, इंडसअसिस्टला माझा मोबाइल नंबर रिचार्ज करायला सांग’, ‘अॅलेक्सा, इंडसअसिस्टला माझे क्रेडिट कार्ड बिल भरायला सांग’ अशा सोप्या सूचना देऊन मोबाइल फोन रिचार्ज करता येतील. क्रेडिट कार्ड बिले भरता येतील; तसेच अन्यही सेवांचा लाभ घेता येईल.

व्हॉइस-बेस्ड सेवा देऊन, निधी हस्तांतर, बिले भरणे, रिचार्ज, खात्याची माहिती घेणे अशा व्हॉइस-बेस्ड सेवा ग्राहकांना सहजपणे व कार्यक्षमपणे वापरता याव्यात, असे इंडसइंड बँकेचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून केले जाणारे सर्व व्यवहार पूर्णतः सुरक्षित आहेत. त्यासाठी नियामकाने निर्धारित केलेली टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन मार्गदर्शक तत्त्वे अवलंबली जातात.

या सहयोगाविषयी बोलताना, इंडसइंड बँकेचे सेव्हिंग्स, डिजिटल व पेमेंट्स बिझनेस हेड व ईव्हीपी रितेश राज सक्सेना म्हणाले, ‘अॅमेझॉनप्रमाणे, कन्झ्युमर टेक्नालॉजिजच्या मदतीने ग्राहकांना उत्तम अनुभव देणे, आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आमचे चॅटबोट ‘इंडसअसिस्ट’चे एकात्मिकरण ‘अॅलेक्सा’शी करण्यातून आम्हाला बँकिंग सेवा बँकिंग चॅनलच्या पलीकडे, इंटरनेट ऑफ थिंग्सपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

‘बहुतांश बँकांनी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी टेक्स्ट-बेस्ड चॅटबोट्सचा वापर केला असून, आम्ही या सेवा व्हॉइस या माध्यमातून देऊन, नाविन्यपूर्ण बँक असण्याची आमची परंपरा कायम राखली आहे. अॅमेझॉनच्या सक्षम सुरक्षा चौकटीचे पाठबळ असलेल्या ‘अॅलेक्सा’च्या वापरण्यास सुलभ व्हॉइस सेवेच्या मदतीने आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देऊ शकू, असा विश्वास आहे,’ असे सक्सेना यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search