Next
‘मीडियम स्पाइसी’च्या सेटवर साजरा झाला सईचा वाढदिवस
BOI
Tuesday, June 25, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:



मुंबई
: ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाच्या सेटवर या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी अभिनेत्री सई ताम्हणकरचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे सईसाठी हे सरप्राईज होते.  सईला तिच्या वाढदिवशी असणारे तिचे प्लॅन्स बदलावे लागू नयेत. यासाठी एक दिवस आधी हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सईला कानोकान खबर लागू न देता या वाढदिवसाचे नियोजन केले होते. चित्रपटाचे अर्जंट शूट असल्यामुळे चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी सेटवर एकत्र यावे, असे सांगण्यात आले. त्यानुसार सईही तिथे आल्यावर, आज शूटींग नसून ही सर्व मंडळी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याचे समजताच तिला आश्चर्याचा धक्का बसला.

चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, ‘सईला तिच्या वाढदिवशी असणारे तिचे प्लॅन्स बदलावे लागू नयेत. यासाठी आम्ही सईचा वाढदिवस आधी साजरा केला. सई वगळता सेटवर सर्वांना या सरप्राईजची पूर्व कल्पना होती. सईला हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. सर्वांनी धमाल करत तिचा वाढदिवस आनंदात साजरा केला.’  

मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात सई ताम्हणकर बरोबरच अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search