Next
‘कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थे’ची ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल
रविवारी (१२ मे) अमृतमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याचे आयोजन
BOI
Friday, May 10, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : ७५ वर्षांपूर्वी, अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात गोरगरिबांना सुलभ व रास्त भावाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थे’चा अमृतमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा रविवारी (१२ मे) सायंकाळी चार वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नारायण गावंड यांनी दिली. 

यासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ‘कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थे’चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्थे’चे सतीश कुमार सोनी हे आहेत. सायंकाळी चार वाजता अनामिका अंबिका निर्मित ‘ऑपरेशन जटायू’ या नाट्यप्रयोगाचा पूर्वार्ध सादर होणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याची माहिती नारायण गावंड यांनी दिली.

या वेळी संस्था स्थापनेची माहिती देताना अध्यक्ष नारायण गावंड म्हणाले, ‘सर्वसामान्यांना एकत्र घेऊन ‘कळवा को. ऑप. कन्झ्यूमर्स सोसायटी लि.’ या प्राथमिक ग्राहक संस्थेची स्थापना आम्ही १२ मे १९४५मध्ये केली. अन्नधान्याच्या टंचाईग्रस्त काळात, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गोरगरिबांना सुलभ व रास्त भावाने व्हावे, या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली. अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे खुल्या बाजारात, व्यापारी धान्याच्या किंमती वाढवत असत. त्या वेळी धान्याच्या किंमती कमी करून सोसायटीने धान्य विकण्यास सुरुवात केली. त्या काळात सोसायटीचे अवघे १९५ सभासद होते. शिधा वाटप दुकानांसोबत दुग्धव्यवसाय हे खाजगी दुकानदारांकडे असलेले क्षेत्र वारणा व शिवामृत दूध संघाकडून वितरकशिप घेऊन संस्थेने आपल्या ताब्यात आणले आणि तिथून सोसायटीची प्रगती सुरू झाली.’

‘कळवे गावातून संस्थेचा शाखाविस्तार खारीगाव, विटावा व दिघा येथे, तसेच सिडकोकडून ऐरोली व नेरुळ-नवी मुंबई या ठिकाणी सहकार तत्त्वावर जागा खरेदी करुन नवीन डिर्पांर्टमेंटल स्टोअर्सद्वारे ग्राहकसेवा सुरू करण्यात आली. संस्थेच्या शाखांमधून डाळी, कडधान्ये व जीवनावश्यक मालाचे पति कि. ग्रॅ.चे दर बाहेरील खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा रुपये तीन ते पाच कमी इतक्या दराने विक्री करण्यात येत आहेत. सध्या ग्राहकांना संगणकाद्वारे वातानुकूलित अद्ययावत सेवा देण्यात येत आहे’, अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच ते पुढे म्हणाले, ‘कळव्यात सहकार मेडिकल स्टोअर्स सुरू करुन नागरिकांना कमी किंमतीत औषधे उपलब्ध करणारी महाराष्ट्रात एकमेव संस्था म्हणून कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेची गणना झाली आहे. संस्थेच्या मेडीकल स्टोअर्सला लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे. वस्तूंचा दर्जा आणि कमी किंमत यांमुळे संस्थेतील वस्तूंना ग्राहकवर्ग वाढत आहे. सध्या संस्थेची विक्री ३५ कोटींच्या वर आहे. सभासद संख्या सात हजार ७१९, तर भागभांडवल रुपये ९४लाखांच्या वर आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश व खरेदीवर एक टक्के बोनस दिला जातो. संस्थेत १३१ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना पधानमंत्री कौशल्य विकास योजना, इन्स्टिटयूट ऑफ को. ऑप. मॅनेटमेंट पुणे इत्यादी संस्थामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. सध्या संस्थेची १० स्वयंसेवा भांडारे, दूध विकी केंद्रे, दोन मेडिकल स्टोअर्स व सहा शिधावाटप दुकाने यांमधून निरंतर ग्राहकसेवा सुरू आहे.’  

याव्यतिरिक्त सामाजिक जाणीवेतून संस्थेने पारसिक डोंगरावर संस्थेचे संचालक, ग्राहक व कर्मचारी यांच्या सहकार्याने गेल्या २५-३० वर्षांत दीड ते दोन लाख वृक्षांची लागवड केली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search