Next
‘एसओटीसी’ची ‘ओला’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 12:20 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : एसओटीसी ट्रॅव्हलने २० जुलै ते चार ऑगस्ट २०१८ या कालावधीत दोन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ‘ओला’ या भारतातील आघाडीच्या राइड-शेअरिंग कंपनीशी सहयोग केला आहे. ही स्पर्धा ‘ओला अॅप’वर घेतली जाणार असून, ती केवळ मुंबई व पुणे येथील युजर्ससाठी असणार आहे.

जे ‘ओला’ वापरकर्ते दोन आठवड्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा प्रवास करतील व कोड एसओटीसी वापरतील, त्यांना सहा रात्री आणि सात दिवस मॉरिशसला विनामूल्य ट्रिप जिंकण्याची संधी मिळू शकते. हा कोड ओला मायक्रो, मिनी व प्राइम राइडसाठी लागू असेल.

या सहयोगाविषयी बोलताना ‘एसओटीसी’चे भारत, एनआरआय मार्केट्स व ई-कॉमर्सचे सेल्स हेड डॅनिएल डिसोझा म्हणाले, ‘ओला ही देशातील आघाडीची राइड-शेअरिंग कंपनी आहे आणि कंपनीच्या युजरची संख्या प्रचंड आहे. प्रामुख्याने मेट्रोमध्ये ही संख्या अधिक आहे. ‘ओला’शी सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रायोगिक हॉलिडेबद्दलच्या ट्रेंडबद्दल आम्ही आशादायी आहोत. मॉरिशसला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांना विविध प्रकारच्या संस्कृतींचा अनुभव घेता येऊ शकतो, तसेच त्यांना मॉरिशसमध्ये मासेमारी, स्कुबा-डायव्हिंग व खरेदी यांचा आनंद घेता येईल. दोन ग्राहक-केंद्री ब्रँडदरम्यानची ही विशेष भागीदारी आमच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे आणि आम्हाला मुंबई व पुणे येथील ओला युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.’

‘ओला’चे मुंबई सिटी हेड शेखर दत्ता म्हणाले, ‘आम्ही ग्राहकांसाठी नेहमीच विशेष वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. हा उपक्रम मुंबई व पुणे येथे दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशातील आघाडीची स्मार्ट मोबिलिटी सुविधा म्हणून, आम्ही ग्राहकांच्या रोजच्या पॉइंट-टू-पॉइंट प्रवासाच्या पलीकडच्या वाहतुकीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर नेहमी भर देतो आणि ‘एसओटीसी’बरोबरची ही भागीदारी या दिशेने योग्य पाऊल आहे.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search