Next
डॉ. धानके यांचा गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरव
दत्तात्रय पाटील
Thursday, January 24, 2019 | 01:57 PM
15 0 0
Share this article:ठाणे : पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप धानके यांनी शासकीय सेवेत केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने गुणवंत अधिकारी म्हणून निवड केली होती. म्हसा यात्रेत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या भव्य सोहळ्यात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांचा गुणवंत अधिकारी म्हणून सन्मानचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

हे प्रदर्शन २१ जानेवारी २०१९ रोजी भरविण्यात आले होते. डॉ. धानके यांनी किन्हवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत राहून शेतकरी हितार्थ अनेक उपक्रम राबवले. राज्यातील पहिले शेतकरी वाचनालय व बळीराजा वस्तू संग्रहालय किन्हवली येथे निर्माण केले आहेत. अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय सेवेसोबत अनेक प्रबोधन शिबिरे घेऊन जनजागृती घडवून आणली. ईगल संस्थेच्या माध्यमातून शंभर कुटुंबात शेळ्यांच्या वाटपासाठी आदिवासी महिलांना साह्य केले. आपल्या लक्षवेधक शासकीय कामातून डॉ. धानके यांनी ठाणे जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना हजारो पशुपालक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

डॉ. धानके यांच्यासोबतच पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल सरोदे (रायता), डॉ. सुभाष पाठारी (पडघा), डॉ. सतीश चंदनशिवे (धसई), डॉ. भागवत दौंड, डॉ. गुरुनाथ पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आमदार पांडुरंग बरोरा, पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला गुळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विनोद राईकवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, काशीनाथ पष्टे, रेखा कंटे, संजय निमसे, मुरबाड पंचायत समिती सभापती जनार्दन पादीर व उपसभापती सीमा घरत उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search