Next
कल्याण येथे कोकण इतिहास परिषदेचे आयोजन
दत्तात्रय पाटील
Saturday, December 15, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this storyकल्याण : कोकण इतिहास परिषद व जीवनदीप कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ जानेवारी २०१९ या दोन दिवशी कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय अधिवेशन या वर्षी कल्याण-गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

यासाठी ‘कोकणची लोकसंस्कृती’ अशी संकल्पना असून, या विषयावर संशोधन पेपर सादर करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही परिषद सर्वांसाठी खुली आहे. यात महाराष्ट्र व गोवा राज्यातील १५० हून अधिक महाविद्यालये सहभागी होणार आहेत. या वेळी ‘कोकणची लोकसंस्कृती’ यावर संशोधकांचे विचारमंथन होणार असून, यात इतिहासाच्या साधनांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या अधिवेशनाच्या निमित्ताने छायाचित्र व माहितीपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात केवळ महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार आहे. कोकणातील ऐतिहासिक वास्तू (लेणी, मंदिरे, किल्ले, वाडे) आणि ऐतिहासिक वस्तू (नाणी, दागिने, देवाचे टाक, इतर छोट्या वस्तू) हे छायाचित्रण स्पर्धेचे विषय आहेत. माहितीपटासाठी कोकणातील ऐतिहासिक वास्तू, परंपरा, सण, उत्सव, जत्रा हे विषय आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी २४ डिसेंबरपर्यंत आपले छायाचित्र व माहितीपट प्रत्यक्ष वा पोस्टाने महाविद्यालाय्च्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
७७४४० ४४७३०, ९२६०६ ०१५२०
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link