Next
रत्नागिरीत संवादिनीवादन कार्यशाळा
तन्मय देवचके दोन दिवस करणार मार्गदर्शन
BOI
Friday, April 26, 2019 | 11:33 AM
15 0 0
Share this article:

तन्मय देवचकेरत्नागिरी : येथील स्वरनिनाद संगीत अ‍ॅकॅडमी आणि ओम साई मित्रमंडळ यांच्या वतीने युवापिढीतील प्रसिद्ध संवादिनीवादक तन्मय देवचके यांची संवादिनीवादनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

संवादिनीवादनाची आवड जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लागावी; तसेच संवादिनीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने आयोजित केलेली ही कार्यशाळा साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोडवरील ओम साई मित्रमंडळाच्या सभागृहात एक मे २०१९ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात आणि दोन मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी होईल. कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित आहे.  

तन्मय देवचके यांचे ‘की टू हार्मनी’ ही संकल्पना आहे. त्यांनी गुरुकुल पद्धतीने पंडित प्रमोद मराठे यांच्याकडे गांधर्व महाविद्यालयात संवादिनीवादनाचे धडे गिरवले. या संवादिनीचा इतिहास, तांत्रिक गोष्टी रंजकपणे मांडल्या जाणार आहेत. हार्मोनियमच्या रियाजासाठीचे वेगवेगळे पलटे, विविध रागांमधील रचनांसाठी ‘फिंगरिंग टेक्निक’ प्रत्येकाच्या क्षमतेनुसार समजावून देण्यात येणार आहे. सूर आणि तालावर पकड आल्यावर त्याचे संगीत अधिकाधिक श्रवणीय व आनंददायी होऊ शकते, या संदर्भातली काही सूत्रे, कोडी याबाबत मार्गदर्शन केले जाईल; तसेच रियाझ, एकल वादन, लेहेरा साथ आदी गोष्टींचाही यात समावेश असेल. 

कार्यशाळेविषयी :
दिवस : एक मे २०१९ 
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात 
दिवस : दोन मी २०१९
वेळ : सकाळी नऊ ते दुपारी दोन  
स्थळ : ओम साई मित्रमंडळाच्या सभागृह, साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड, रत्नागिरी 
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी : विजय रानडे- ७७४१० २८४८८/९४२२३ ७६२२२, चैतन्य पटवर्धन- ८४५९१ ७८५६९ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search