Next
‘अंतर्गत जलवाहतुकीत मुळा-मुठेचा समावेश’
प्रेस रिलीज
Wednesday, April 04 | 11:49 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘केंद्रीय रस्ते आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अंतर्गत जलवाहतूक योजनेच्या बिलातील मूळ प्रस्तावात बदल करून मुळा-मुठा नद्यांची नावे यात समाविष्ट करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, आगामी पावसाळी अधिवेशनात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे,’ अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. 

सध्या चालू असलेल्या संसदीय अधिवेशनात खासदार शिरोळे यांनी गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन यासंबंधी विस्तृत चर्चा केली.

पाच मे २०१५ रोजी केंद्रीय रस्ते आणि जल वाहतूक मंत्री गडकरी यांनी अंतर्गत जलवाहतूक योजनेसंदर्भात एक बिल संसदेत सादर केले होते. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांशी प्रकल्पात पुणे शहरातील मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश व्हावा, अशी मागणी खासदार शिरोळे यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मुळा आणि मुठा नद्यांचा समावेश या प्रकल्पात होण्यासाठी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र देखील लिहिले होते.
 
सध्या चालू असलेल्या संसदीय अधिवेशनात खासदार  शिरोळे यांनी गडकरींची दिल्लीत भेट घेऊन विस्तृत चर्चा केल्यानंतर गडकरींनी या बिलातील मूळ प्रस्तावात बदल करून मुळा आणि मुठा नद्यांची नावे यात समाविष्ट करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून आगामी पावसाळी अधिवेशनात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

‘मुळा-मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश या प्रकल्पात होऊन या मार्फत शहरातील वाहतुकीला एक नवीन आयाम जोडला जाणार असून, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे,’ असा मत खासदार शिरोळे यांनी व्यक्त केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link