Next
‘गृहनिर्माण महासंघा’तर्फे राज्यस्तरीय चर्चासत्र
प्रेस रिलीज
Wednesday, July 25 | 11:39 AM
15 0 0
Share this story

पुणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वतीने गृहनिर्माण संस्थांसमोरील विविध प्रश्नांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र २५ जुलै रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत टिळक रोडवरील विशाल सहयाद्री भवन येथे होणार आहे.

कलम १०१ प्रमाणे थकबाकी वसुली, संस्थांच्या पुनर्विकासातील अडचणी व गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र विभाग या विषयावर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे श. त्रिं. भिडे यांनी ही माहिती दिली.

यात सहकार विभागाचे अधिकारी, गृहनिर्माण संस्थांचे पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे येथील प्रतिनिधी, आर्किटेक्ट, वकिल, मराठी बांधकाम व्यावसायिक संघाचे प्रतिनिधी सहभागी होतील.

चर्चासत्राविषयी :
दिवस :
बुधवार, २५ जुलै २०१८
वेळ : दुपारी तीन ते पाच
स्थळ : विशाल सहयाद्री भवन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टिळक रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link