Next
गोष्ट छोटी डोंगराएवढी!
BOI
Tuesday, July 23, 2019 | 10:27 AM
15 0 0
Share this article:

गावाचे चित्र म्हटले की एक घर, जवळून वाहणारी नदी, पाठीमागे डोंगर, आकाशात उडणारे पक्षी हटकून दिसत असे; पण गावचे शहरीकरण होऊ लागले, ग्रामविकासाच्या नावाखाली ग्रामसंस्कृतीचा विसर पडला अन गावचे गावपण हरवले. अशा गावांच्या, गावकऱ्यांच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी हो‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’मधून सांगितल्या आहेत. 

कोळेवाडीतील जनार्दन हा नाचकाम करणाऱ्या रेखाचा मुलगा. सैन्यात असताना दहशतवाद्यांचा खात्मा करताना तो धारातीर्थी पडतो. त्याची जात माहित नसल्याने कोणत्या जातीच्या स्मशानात त्याच्यावर अंतिमसंस्कार करायचे, हा प्रश्न ‘अमर राहे!पण कुठे’ या कथेतील गावकऱ्यांना पडतो. ‘सोनामावाशी’चे लग्न झाल्यावर पाऊस पडल्याने तिला बायका देवी मानायच्या. पतीच्या मागे तिने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले; पण मुले मात्र नोकरीनिमित्त शहरात गेल्यानंतर आईला विसरले. गावातील राजकारणाचा बळीचा बकरा ठरलेला शंकर घाडगे, आमदारांचा राइट हँड असलेल्या दीप्याचे भवितव्य, स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या विन्याने मैत्रिणीला सन्मार्गावर आणण्यासाठी लढविलेली ‘स्मार्ट’ शक्कल, अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.

पुस्तक : गोष्ट छोटी डोंगराएवढी
लेखक : अरविंद जगताप
प्रकाशक : इंडियन भारत पब्लिकेशन्स 
पाने : १८० 
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search