Next
‘विदिन- विदाउट’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, May 17 | 11:28 AM
15 0 0
Share this story

गिरीश धुमाळ यांनी रेखाटलेली चित्रेपुणे : दिवंगत कलाकार गिरीश धुमाळ यांच्या मित्रांच्या पुढाकाराने त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विदिन- विदाउट’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता या चित्र प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे.

गिरीश धुमाळ१८ ते २० मे या कालावधीत भांडारकर रस्त्यावरील ‘आर्ट टू डे गॅलरी’ येथे सकाळी ११ ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या वेळी गिरीश यांचे मित्र आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा देतील. याबरोबरच गिरीश यांच्या काही कविता, लिखाण, त्यांच्या मित्रांच्या आठवणी यांवर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन देखील या कालावधीत होणार आहे.

‘आपल्या कलाकार मित्राच्या कलाकृती आणि लेखन तो गेल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींच्या समोर याव्यात आणि त्याचा आंतरिक प्रवास एकदम उलगडला जावा...’ धुमाळ यांच्या कधीही समोर न आलेल्या कलाकृती पाहून त्यांच्या मित्रांच्याही याच भावना होत्या. आपल्या चित्रकार मित्राचा हा विशेष पैलू जगासमोर यावा या उद्देशाने धुमाळ यांच्या मित्रांनी त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

धुमाळ हे अभिनव कला महाविद्यालयाच्या १९९४च्या बॅचचे कमर्शियल आर्टस्चे विद्यार्थी. कमर्शियल आर्टिस्ट म्हणून त्यांनी विविध प्रकारची व्यावसायिक कलेची कामेही केली; मात्र कमर्शियल आर्टिस्ट असूनही गिरीश अभिव्यक्तीस अधिक मोकळीक देणाऱ्या पेंटिंगच्या विश्वामध्ये अधिक रमले.

डिसेंबर २०१७मध्ये गिरीश यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी रेखाटलेली ही चित्रे मित्रांच्या पाहण्यात आली. ती वेगळी आहेत याची जाणीव या सर्व मित्रांना झाली आणि त्यांच्या या कलेबद्दल इतरांना माहिती व्हावी व ती जगासमोर यावी या तळमळीने त्यांच्या अभिनव कला महाविद्यालयाच्या मित्रांनी ‘विदिन- विदाऊट’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या प्रदर्शनात धुमाळ यांच्या निवडक ५० चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, यामध्ये त्यांनी चितारलेल्या ‘अॅबस्ट्रॅक्ट’ अर्थात अमूर्त कलाकृतींचा समावेश आहे. ही चित्रे ही विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.

चित्र प्रदर्शन आणि उद्घाटनाविषयी :
उद्घाटन : १७ मे २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
दिवस : १८, १९, २० मे २०१८
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सहापर्यंत
स्थळ : आर्ट टू डे गॅलरी, भांडारकर रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link