Next
आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सव साजरा
BOI
Wednesday, October 10, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this story

शारदा देवीच्या देखण्या मूर्तीसोबत पर्यावरणपूरक आरास केली आहे.रत्नागिरी : शारदोत्सव म्हणजे शक्तीची उपासना. विद्यार्थ्यांनी या काळात विद्येची प्रार्थना करावी, चांगल्या विचारांची पेरणी त्यांच्या मनात व्हावी, अशा हेतूने रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात गेली अनेक वर्षे शारदोत्सव साजरा केला जातो. आज घटस्थापनेच्या दिवशी (१० ऑक्टोबर २०१८) शारदादेवीची प्रतिष्ठापना करून शारदोत्सवाचा प्रारंभ झाला.

रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, ‘शारदोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करावे आणि मनातील वाईट विचारांचा संहार करून चांगल्या शक्तीची उपासना करावी. भारतीय माणूस उत्सवप्रिय आहे. देवीची रूपे विविध असली, तरी शक्ती एकच आहे. नऊ दिवस देवीने असुरांना मारण्यासाठी भीषण युद्ध केले, दैत्यांचा संहार केला. स्त्री शक्ती प्रेरणा देते. शैलपुत्री, ब्रह्मचरिणी, कूष्मांडा, स्कंधमाता, कात्यायनी, काळरात्री, सिद्धरात्री अशी देवीची रूपे आहेत. भारतात नवरात्रौत्सवाच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत. माणसातील आसुरी शक्तीचा नाश व्हावा म्हणून उपासना करा. चारित्र्य, वर्तन चांगले ठेवा आणि या काळात विद्येचे दान मागा.’ 

शारदोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गायत्री गुळवणी. शेजारी मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम.

दसऱ्याला आपण सोने लुटतो. त्याचा संदर्भ देत ‘चारित्र्य, वर्तन चांगले ठेवा आणि सोन्यासारखे राहा,’ असे आवाहन सौ. गुळवणी यांनी केले. ‘आगाशे शाळेत विविध सण साजरे करण्याची परंपरा असल्याने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात,’ असेही त्या म्हणाल्या.आगाशे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी सांगितले, ‘पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक संघामार्फत शारदोत्सव होणार आहे. यात नाट्यछटा स्पर्धा, आयुर्वेदाचार्य मंजिरी जोग यांचे व्याख्यान, पाना-फुलांच्या रांगोळीची स्पर्धा असे उपक्रम आयोजित केले आहेत. यात शाळेतील सर्व ६५० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. नवरात्रौत्सवानिमित्त शारदा देवीची देखणी मूर्ती व पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे.’

१० ऑक्टोबर रोजी ५० पुष्परांगोळ्यांनी शाळेचे नाटेकर सभागृह सजले होते. या वेळी शाळेतील लिपिक सौ. दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. रांगोळ्यांचे परीक्षण शिक्षक श्री. लवंदे व श्री. पंगेरकर यांनी केले. सुधीर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवरुखकर यांनी आभार मानले.

आकर्षक पुष्परांगोळ्या


(या शाळेतील शारदोत्सवाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link