Next
‘आंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला’
प्रेस रिलीज
Thursday, March 29 | 12:20 PM
15 0 0
Share this story

गंगाधर पानतावणेमुंबई : ‘पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने, आंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला,’ अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी, पानतावणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, ‘दलित साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत गंगाधर पानतावणे यांचं भरीव योगदान होतं. त्यांनी आंबेडकरी ध्येयवाद पूर्ण समजून घेतला होता. आपल्या लेखन आणि संशोधनातून त्यांनी आंबेडकरी चळवळीला मोलाचे मार्गदर्शन केले. ते विद्वान व मृदुभाषी होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले आणि मराठवाड्याच्या वैचारिक कार्यात भर घातली. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link