Next
पुण्यात आंतरराष्ट्रीय फ्लोरा एक्स्पोला सुरुवात
प्रेस रिलीज
Saturday, February 23, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this storyपुणे : येथे मीडिया टुडे ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४व्या आंतरराष्ट्रीय फ्लोरा’, ११व्या आंतरराष्ट्रीय होर्टी व १३व्या आंतरराष्ट्रीय लँडस्केप आणि गार्डनिंग एक्स्पोची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्पेनचे फ्लोर मार्केट गोल्बल एडिटर ख्रिसटन वोस श्लूरल यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन २४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पुण्यातील मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत खुले राहणार आहे.

फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि ग्रीनहाउस टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स, फार्म मशिनरीज आणि प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजीज या क्षेत्रासाठी हे प्रदर्शन भारतातील सर्वांत भव्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. या प्रदर्शनात उत्पादने व तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यात फुले, फळे, भाज्यांची रोपे, औषधी वनस्पती आणि सजावटीचे रोपे, आंतरराष्ट्रीय फुले, तसेच हायड्रोपोनिक्स, सौरऊर्जाचे तंत्रज्ञान, प्लांट टेक्नॉलॉजी,  बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीनहाउस तंत्रज्ञान, ऑटोमेशन आदी गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

२३ फेब्रुवारीला ‘हरितगृह निर्माण संकल्पना’ या विषयावर वनस्पती, ठिकाणे आणि लोक अशा आंतरराष्ट्रीय परिषद आणि नेटवर्किंग मीट होणार आहे. त्यानंतर ज्या व्यक्तींनी हरित क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे त्यांना इंडियन फ्लॉवर अँड प्लांट्स इंडस्ट्री एक्सलन्स अॅवॉर्ड्स प्रदान केले जातील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link