Next
कोथरूड सांस्कृतिक महोत्सव २८ जानेवारीपासून
प्रेस रिलीज
Friday, January 25, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘दर वर्षीप्रमाणे यंदाही रसिकांसाठी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सजलेला ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सव २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता आयडियल कॉलनी येथील मैदानावर होईल. यात ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘चला हवा येवू द्या’, ‘स्वरत्रिवेणी’, आणि ‘स्वरतरंग’ असे बहारदार कार्यक्रमांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे,’ अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या वेळी संस्कृती प्रतिष्ठानचे नवनाथ जाधव व दिनेश माथवड उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन २८ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते होईल. या वर्षी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘संस्कृती कला पुरस्काराने’ सन्मानित केले जाणार आहे. पहिल्या दिवशी दिग्दर्शक महेश कोठारे यांचा जीवनप्रवास अमोल भगत प्रस्तुत ‘याला जीवन ऐसे नाव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. त्यात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सावनी रवींद्र व प्रसन्नाजीत कोसंबी आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

२९ जानेवारीला ‘चला हवा येवू द्या- होऊ दे व्हायरल’ची पूर्ण टीम हास्य मैफिल रंगविणार आहेत. डॉ. नीलेश साबळे, भारत गणेशपुरे, भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे अशा सगळ्या धमाल कलाकारांची धमाल प्रत्यक्ष पाहता व अनुभवता येणार आहे.

३० जानेवारीला ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘स्वरत्रिवेणी’ हा कार्यक्रम होईल. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, आनंद माडगुळकर, अतुल परचुरे आदी कलाकार सहभागी होतील. ३१ जानेवारीला गायक महेश काळे यांच्या ‘स्वरतरंग’ ही सुरेल मैफल रंगेल. याच मैफलीने महोत्सवाची सांगता होईल.

मोहोळ म्हणाले, ‘महोत्सवाचे नववे वर्ष असून, या महोत्सवात हृदयनाथ मंगेशकर, हरिहरन, कीर्ती शिलेदार, सुरेश वाडकर, जयमाला इनामदार आदी मान्यवर सहभागी झाले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उषा मंगेशकर, महेश मांजरेकर यांना यापूर्वी महोत्सवाच्या निमित्ताने गौरविण्यात आले आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search