Next
वनसंपदेसाठी ‘सीड्स बॉल’
BOI
Tuesday, May 16, 2017 | 02:15 PM
15 0 0
Share this article:

सीड्स बॉलपुणे : येथील ‘दी सोसायटी फॉर सायन्स, एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल’ आणि ‘भवताल’ या संस्थांनी यंदा झाडे लावण्यासाठी ‘सीड्स बॉल’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या दोन्ही संस्थांचे स्वयंसेवक लोकांकडून बिया जमा करण्याचे काम करत आहेत. त्या बिया लवकरच ‘सीड्स बॉल’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.

माती आणि शेणाच्या मिश्रणात एखादी ‘बी’ घालून त्यातून ‘सीड बॉल’ म्हणजेच चिखलाचे गोळे तयार करण्यात येतात. त्यानंतर हेच ‘सीड्स बॉल’ शहराभोवतीच्या मोकळ्या परिसरात, टेकड्यांवर टाकले जातात. त्यातून झाडे रुजतात. या वेळी प्रायोगिक तत्त्वावर पाचशे ते हजार ‘सीड्स बॉल’ तयार करण्याचा दोन्ही संस्थांच्या स्वयंसेवकांचा मानस आहे. यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यत आले आहे. २० ते २७ मे या कालावधीत पुण्यातील राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात सायंकाळी चार ते सहा या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
याविषयी स्वयंसेवक इरावती बरसोडे म्हणाल्या, ‘या उपक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येईल. चिंच, कडुनिंब, हरडा, बेहडा अशा स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बियांपासून सीड्स बॉल तयार केले जातील. शेण आणि मातीमध्ये बी घालून स्वयंसेवक आणि हौशी नागरिकांच्या मदतीने त्याचे गोळे केले जातील. नुसत्या बिया मोकळ्या जागेत टाकल्यास, त्या पक्षी खाऊ शकतात किंवा बी उडून दुसरीकडे जाऊ शकते; मात्र ‘सीड्स बॉल’मुळे बी त्यात रुजण्यास आणि त्यातून रोपटे तयार होण्यास मदत होणार आहे. हे ‘सीड्स बॉल’ गिर्यारोहक, पर्यावरणप्रेमींनाही देण्यात येतील.’
...............
झाडांसाठी असाही उपक्रम

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील एका तरुणाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देण्यासाठी लग्नपत्रिकेबरोबर चक्क झाडांच्या बिया पाठवल्या आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. तो कायमस्वरूपी लक्षात राहावा, म्हणून सारे जण प्रयत्न करत असतात. त्याची सुरुवात लग्नपत्रिकेपासून होते. ती इतरांपेक्षा वेगळी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्याचप्रमाणे ही बिया पाठवण्याची संकल्पना आहे. खंडू शंकर काशिद आणि तेजस्विनी प्रकाश पापडे यांनी आपल्या लग्नाच्या पत्रिकेसमवेत अक्षतांऐवजी तुळस, गुलमोहर, अंजन, सीताफळ, रामफळ, चिंच, बाभूळ आदी विविध झाडांच्या बिया पाठवल्या आहेत. या बिया नातेवाइकांनी आपल्या घराभोवती ओलाव्याच्या ठिकाणी लावाव्यात अशी वधू-वरांची संकल्पना आहे, अशी माहिती देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search