Next
सोलापूररत्न पुरस्काराचे वितरण
प्रेस रिलीज
Monday, February 05, 2018 | 04:44 PM
15 0 0
Share this storyपुणे : जन्माने सोलापूरकर मात्र कर्माने पुणेकर अशा विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या मान्यवरांचा ‘सोलापूर रत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. राज्याचे सहकार, पणन व वस्त्र्योद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुण्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये अग्रेसर असलेले बाळासाहेब कांबळे, समर्थ ग्रुपचे चेअरमन विठ्ठल माणिक ढवळे, बांधकाम व्यवसायिक अंकुश आसबे या तीन सोलापूरकरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सोलापूरची ओळख सांगणाऱ्या याच सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पुणेकरांना पाहता येण्यासाठी दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सोलापूर सार्थक सोहळ्याचे आयोजन केले होते. याचवेळी सोलापूररत्न पुरस्कार वितरण सोहळा झाला. या प्रसंगी आयोजक लक्ष्मीकांत गुंड, सतीश साठे, प्रमोद साठे, उपस्थित होते. स्वागताध्यक्ष प्रदीप नागणे यांनी आभार मानले.

वस्त्र्योद्योगमंत्री देशमुख म्हणाले, ‘पुण्यातील सोलापुरकरांनी आपल्या मातीचे ऋण फेडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, सोलापूरचे महात्म्य पुणेकर आणि पर्यायाने राज्यातील इतरांना सांगून त्यांना सोलापूरकडे येण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. वस्त्रोद्योगासोबतच आज सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून देखील पुढे येत आहे. आयटी, बांधकाम व्यवसाय, अॅग्रो टुरिझम, शिक्षण, खाद्य पदार्थ असा वेगवेगळ्या क्षेत्रात शहराने चांगली प्रगती केली आहे. याच प्रगतीचे मार्केटींग सोलापुरकरांनी इतरांना सांगून सोलापूरची किर्ती सर्वदूर पोहचवण्याचे काम करावे.’

लक्ष्मीकांत गुंड म्हणाले, ‘सोलापूरकरांची एकमेकांना भेट व्हावी, खाद्यपदार्थांसह अनेक गोष्टी पुन्हा अनुभवता याव्यात तसेच पुण्यातील लोकांना सोलापूरच्या संस्कृती माहिती होण्यासाठी सोलापूर सार्थक सोहळा आयोजित केला होता.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link