Next
‘आजची पिढी फास्ट फूडच्या जाळ्यात’
BOI
Friday, November 24 | 06:07 PM
15 0 0
Share this story

जुनी सांगवी (पुणे) : ‘मातांनी स्वत:च्या बालकांना योग्य आहार दिला पाहिजे. आजची पिढी या फास्ट फूडच्या जाळ्यात ओढली जात आहे. शिवरायांचे बालपण प्रत्येक बालकांनी व्यक्तिगत जीवनात आचरणात आणून जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे,’ असे प्रा. गजानन वाव्हळ यांनी सांगितले.

येथे शिवविचार जागर अभियान व कै. सौ. शकुंतलाबाई शितोळे नूतन माध्यमिक विद्यालयात तीन दिवसीय संगीत बाल शिवायण या शिवचरीत्रातील घटनांवर आधारित गाथानाट्य वाव्हळ यांनी सादर केले. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईस आऊसाहेब म्हणत, तर वडील शहाजीराजे यांना आबासाहेब म्हणत; मात्र आजची पिढी आईला मम्मी व वडिलांना पप्पा असे संबोधते. त्या काळी पिझ्झा, बर्गर असे पदार्थ नव्हते. फास्ट फूड खाऊन लढाया जिंकल्या जात नाहीत. मातांनी स्वत:च्या बालकांना योग्य आहार दिला पाहिजे.’

या वेळी प्रा. वाव्हळ व बालसहकाऱ्यांनी शिवचरित्रातील घटना व प्रसंगाचे नाट्याद्वारे सादरीकरण केले. त्यांनी आपल्या खास, ओघवत्या शैलीतून शिवचरित्रातील घटनाक्रमांची ओळख विद्यार्थ्यांसमोर नाट्याद्वारे सादर केली.

या संगीत बालशिवायण गाथानाट्याचे उद्घाटन माजी स्थायी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे सतीश साठे, रामभाऊ खोडदे, परशुराम मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासाठी भाऊसाहेब दातीर, सुनीता टेकवडे, हेमलता नवले, मनीषा लाड, शीतल शितोळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link