Next
पुण्यातील ‘पोस्ट पेमेंट बँके’चे जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
BOI
Monday, September 03, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या पुणे शाखेचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’च्या पुणे शाखेचे उद्घाटन शनिवारी, एक सप्टेंबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयात झाले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, महापौर  मुक्ता टिळक उपस्थित होते. या वेळी जावडेकर यांनी पोस्टाच्या कामाचे कौतुक केले आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषतः मुद्रा योजना, सुकन्या समृद्धी योजना, जन सुरक्षा योजना यांचे फायदे त्यांनी स्पष्ट केले. 

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे यांनी एक सप्टेंबर रोजी ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ देशाला अर्पण  केली. राष्ट्रीय उद्घाटन समारंभासोबतच, देशभरातील ६५० जिल्हा मुख्यालय शाखा आणि देशभरातील इतर तीन हजार २५० सेवा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. 

भारतीय टपाल विभागाने ६५० शाखा आणि अंदाजे १.५५ लाख सेवा केंद्र असणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ स्थापन केली असून, ही बँक देशभरातील ग्राहकांना विविध डिजीटल पेमेंट सेवा पुरविणार आहे. याद्वारे आधार कार्ड वापरून मिनिटामध्ये विनाकागदपत्र खाते सुरू करता येईल. खातेधारक ‘क्यू आर कार्ड’ आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे डिजीटल सेवांचा लाभ घेऊ शकतील. पोस्टमन हा या बँकेच्या नेटवर्कचा सर्वत्र पोहोचणारा दूत असून, तीन लाखांपेक्षा जास्त पोस्टमन आणि ग्रामीण सेवकांद्वारे सर्वदूर या सेवा पुरवल्या जातील. बचत खाते आणि चालू खाते उघडणे, पैसे पाठवणे आणि हस्तांतरण करणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डी.बी.टी.), बिल आणि युटीलिटी पेमेंट, उद्योग आणि व्यापारी पेमेंट आदी सेवा पुरविणार आहे. या सेवा आणि उत्पादने बँकेचा उच्च दर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, घरपोच बँकिंग, काउंटर सेवा, मायक्रो एटीएम, मोबाईल बँकिंग अॅप, एस.एम.एस. आणि आय.व्ही.आर. या विविध माध्यमांद्वारे प्रदान केल्या जातील. ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँकने’ कर्ज, गुंतवणूक आणि विमा सेवा देण्यासाठी विविध आर्थिक संस्थांसोबतही भागीदारी केली आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search