Next
भोर तालुक्यात ‘भात लावणी’ महोत्सव
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटोपुणे : ‘फूटलूज जर्नीज आणि सिनर्जी हॉलिडे व्हिलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात ‘भात लावणी’ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव कुरुंजी येथे होणार आहे,’ अशी माहिती माहिती ‘सिनर्जी’चे संचालक राजेंद्र आवटे, तसेच ‘फूटलूज जर्नीज’चे संचालक परेश देशमुख यांनी दिली.

१५ जुलै २०१८ रोजी भाटघर धरणाच्या काठावरील भातशेतीत दिवसभर ही भात लावणी चालेल. भात लागवडीची माहिती दिली जाणार असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर भात लागवडीचा अनुभव आणि संवाद असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. या वेळी ‘सिनर्जी’चे मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी : explore@footloosejourneys.com
संपर्क : ९७६५८ ९८७३३

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search