Next
सुधागड येथे पॅरा मिलिटरी प्रवेशपूर्व तीन महिन्यांचे प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Saturday, May 11, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : शहरात कार्यरत असणार्‍या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ आणि टाटा कॅपिटल, तसेच सुधागड तालुका मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्यातील तरुणांना सैनिकी शिक्षण घेता यावे यासाठी लष्करी सेवा व पॅरा मिलिटरी प्रवेशपूर्व तीन महिन्यांचा प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम १३ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पाली, सुधागड येथील सुधागड तालुका मराठा समाज हॉलमध्ये सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. 

सध्या रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनी देशसेवा जोपासावी, सुधागडमधील दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण मिळावे, त्यांनी लष्करामध्ये जावे या उद्देशाने संघातर्फे तीन महिन्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध केली आहे. या योजनेस टाटा कॅपिटल या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. सुधागड तालुका आणि ठाण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली नावे संस्थेच्या कार्यालयात व पदाधिकार्‍यांकडे नोंदविली आहेत. 

‘या कार्यक्रमाला सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी-सभासद, सुधागड तालुका मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच टाटा कॅपिटलचे मुख्य व्यवस्थापक, पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला सुधागड तालुका आणि ठाणे, मुंबई, पुणे येथील रहिवासी तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
AJAY About 70 Days ago
Thanks For Relies my Socail News
0
0

Select Language
Share Link
 
Search