Next
‘पाणीटंचाई काळात मूरघास जनावरांसाठी संजीवनी ठरेल’
कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांची मूरघास निर्मित प्रात्यक्षिक प्रयोगाला भेट
BOI
Monday, December 03, 2018 | 03:11 PM
15 0 0
Share this article:सोलापूर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ कृषी विज्ञान केंद्र व सोलापूर येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या जनावरांसाठी मूरघास निर्मित प्रात्यक्षिक प्रयोगाची पाहणी कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी नुकतीच केली. पाणीटंचाई काळात मूरघास हा जनावरांसाठी संजीवनी ठरू शकणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.  

या वेळी सिंह यांनी कृषी विभागामार्फत राबविलेल्या वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत चारा बियाणे वाटप केलेल्या शेतकऱ्यांना उत्पादित चाऱ्यापासून मूरघास निर्मिती करण्याचे आवाहन केले. वळकुंडे प्रभारी कार्यक्रम समन्वयक आणि विषय विशेषज्ञ (पशू विज्ञान व दुग्धशास्त्र) डॉ. तानाजी यांनी मूरघास निर्मिती तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळी सोलापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वि. एम. अमृतसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बिराजदार, ‘आत्मा’चे विजय बरबडे, विषय विशेषज्ञ (मृद व रसायनशास्त्र) काजल जाधव, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) दिनेश क्षीरसागर, मोहोळ तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी, पी. डी. पाटील यांसह कृषी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे अजय दिघे, काजल जाधव, किरण जाधव, नरेंद्र जाधव, तुषार आहिरे, सुयोग ठाकरे, संजय बनसोडे, ज्ञानेश्वर तांदळे, नितीन बागल, अरुण गांगोडे, महेश ढवळे, गणेश बोडके आदींनी विशेष परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 26 Days ago
Can this idea be put to use by others?
0
0

Select Language
Share Link
 
Search