Next
नेत्रतर्पण शिबिराचा २०० जणांना लाभ
प्रेस रिलीज
Monday, October 08 | 03:10 PM
15 0 0
Share this story


पुणे : तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात जवळपास २०० जणांनी नेत्रतर्पण उपचार घेतले. ३५ डॉक्टरांच्या चमू यासाठी कार्यरत होता.   

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल अभय शास्त्री, लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष श्रीकांत बाहेती, सचिव राजेश सोनी, पुखराज संचेती, मनोहर कुटुंबे यांच्यासह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्यांनीही नेत्रतर्पण करून घेतले. वैद्य हरीश पाटणकर व वैद्य स्नेहल पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले. शेठ ताराचंद रुग्णालयाजवळील वाहतूक पोलीस आणि रास्ता पेठ पोलीस चौकीतील पोलीस यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.

‘नेत्रतर्पण उपचारामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते; तसेच चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सतत संगणकावर काम करणारे, उन्हात आणि धुळीत प्रवास करणारे यासह सर्वच नागरिकांनी नेत्रतर्पण केले पाहिजे. डोळ्यांना ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करण्याचे काम नेत्रतर्पण करते. या उपचारासाठी २० ते २५ मिनिटांचा वेळ लागतो’, असे डॉ. हरिश पाटणकर व स्नेहल पाटणकर यांनी सांगितले. अभय शास्त्री यांनीही लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link