Next
सेवाज्योती परिषदेला महिलांचा उदंड प्रतिसाद
BOI
Tuesday, February 19, 2019 | 03:12 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सेवा सहयोग फाउंडेशन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि दृष्टी अध्ययन प्रबोधन केंद्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सेवाज्योती परिषदेला समाजसेविका, कंपन्यांच्या महिला प्रतिनिधींचा उदंड प्रतिसाद मिळाला.

रविवारी,१७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या या एकदिवसीय परिषदेत दोनशे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या ३५० पेक्षा अधिक महिला समाजसेविका, २५ पेक्षा  अधिक कंपन्यांतील सामाजिक जबाबदारी विभागाच्या महिला अधिकारी, प्रतिनिधी, तसेच १७५ पेक्षा अधिक विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. 

या परिषदेला पर्सिस्टंट फाउंडेशनच्या सोनाली देशपांडे, प्राज फाउंडेशनच्या परिमल चौधरी,  ‘क्रेडीटस्विस’च्या झहाविया ऑफिसवाला, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या अंजली देशपांडे, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या विद्या देशपांडे, सेवा सहयोगच्या माधुरी नागरस, सिमंतीनी खोत यांच्यासह ज्ञानप्रबोधिनीच्या डॉ. अनघा लवळेकर, सुवर्णा गोखले, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ. संजीवनी केळकर, डोअरस्टेप स्कुलच्या रजनी परांजपे, उदयॊग्यवर्धिनी सोलापूरच्या चंद्रिका चौहान उपस्थित होत्या. 

या वेळी किशोरी विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयांवरील चर्चासत्रे, लेखन कार्यशाळा घेण्यात आल्या. विद्यार्थीवर्गासाठी वेगळे सत्र घेण्यात आले. या कार्यशाळांतून किशोरी विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य या विषयांचे विविध पैलू मांडणारे शोधनिबंध अनेक समाजसेविकांनी सादर केले. या सर्व शोधनिबंधांचे संकलित पुस्तक सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. 

राज्यभरात विविध समस्यांवर कार्य करणाऱ्या समाजसेविकांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने सेवाज्योती परिषदेचा उपक्रम राबवण्यात आला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search