Next
‘सिनेमा-सातारकरांच्या संग्रहातील’ प्रदर्शनाचे आयोजन
यादें सिनेसंगीत क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
BOI
Thursday, May 02, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

सातारा : येथील यादें सिनेसंगीत क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सिनेमा-सातारकरांच्या संग्रहातील’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात चित्रपट कलावंतांचे फोटो, पुस्तके, कात्रणे, दिनदर्शिका इत्यादी साहित्य पहायला मिळणार आहे. 

किरण माने
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, तीन मे रोजी संध्याकाळी पाच वाजता नगरवाचनालयाच्या प्रदर्शन हॉलमध्ये प्रसिद्ध लेखक, अभिनेते किरण माने यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अमरावती येथील चित्रपट संग्राहक दीपक चौधरी, ज्येष्ठ चित्रपट निर्माते अरुण गोडबोले उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन पाच मे पर्यंत सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
‘सिनेमा-सातारकरांच्या संग्रहातील’ प्रदर्शन 
स्थळ : नगरवाचनालय हॉल
दिवस : शुक्रवार, तीन मे ते पाच मे. 
वेळ : सकाळी दहा ते दुपारी एक व संध्याकाळी चार ते आठ.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search