Next
मुलांनो, निर्भय व्हा
प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांचा आश्रमशाळेतील मुलांना संदेश
डॉ. अमोल वाघमारे
Monday, September 17, 2018 | 11:19 AM
15 0 0
Share this article:



आंबेगाव :
‘मनात कोणत्याही प्रकारची भीती वा न्यूनगंड बाळगू नका. तुम्ही निर्भय बना. हीच तुमच्या यशाची पहिली पायरी असेल,’ असा संदेश सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांनी राजपूर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील आश्रमशाळेतील मुलांना दिला. व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर आश्रमशाळेतील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानावेळी ते बोलत होते. 

राज्याच्या आदिवासी भागात आदिवासी आश्रमशाळा कार्यरत असतात. या आश्रमशाळांच्या माध्यमातून परिसरातील आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत असतात. या आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या असतात. या आश्रमशाळांच्या माध्यमातून मुलांचा भावनिक, मानसिक, शैक्षणिक विकास होत असतो. या आश्रमशाळांतील मूलभूत सुविधांची वानवा व येथील असुरक्षितता याविषयी राज्यभर खूप चर्चा झालेली आहे. 

या पार्श्वभूमीवर आदिवासी आश्रमशाळांमध्ये काही सकारात्मक प्रयोग व कृती कार्यक्रम केले जात आहेत. आंबेगाव तालुक्यातील राजपूर गावातील शासकीय आश्रमशाळेत शहीद राजगुरू ग्रंथालय, फलोदे व शासकीय आश्रमशाळा, राजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी डॉ. हनुमंत भवारी यांचा विशेष व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आश्रमशाळेतील सुमारे ३००हून अधिक मुले उपस्थित होती.

सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे त्यांनी उदाहरणासहित सांगितले. ग्रामीण भागातील मुलांकडे खूप साऱ्या क्षमता असूनही आत्मविश्वासाची कमतरता व मनातील भीती यामुळे ती मागे राहतात. यावर मात करण्याकरिता मुलांसाठी विविध विधायक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, असे डॉ. भवारी यांनी आवर्जून सांगितले.

या वेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. दोडके सर, प्रा. मयुरी भवारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बोऱ्हाडे सर यांनी केले. आभार दोडके सर यांनी मानले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search