Next
येस बँकेच्या अतिरिक्त संचालकपदी डॉ. प्रतिमा शोरे
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 05:17 PM
15 0 0
Share this story

डॉ. प्रतिमा शोरे
पुणे:  येस बँकेने कंपनी अधिनियम २०१३  च्या तरतुदीनुसार, येस बँकेच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या ‘भागधारक’ डॉ. प्रतिमा शोरे यांची २६ एप्रिलपासून स्वतंत्र संचालिका म्हणून नियुक्ती केली आहे.  डॉ. शोरे यांना अॅकॅडेमिक( मार्केटिंग), ग्राहक व्यवहार, मार्केट रिसर्च, ट्रेनिंग आणि कस्टमर इन्साइट मॅपिंग याचा तब्ब्ल २१ वर्षांचा अनुभव आहे. 

या वेळी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘डॉ. प्रतिमा शोरे एक वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि व्यवसायिक आहेत.  बँकेच्या पुढल्या वाटचालीकरीता येस बँकेच्या संचालक मंडळाच्या सभासद म्हणून त्यांची मदत होईल.’

डॉ. प्रतिमा शोरे सध्या पुण्यातील अग्रगण्य बी- स्कूल  सिंबायोसिस  सेंटर फॉर  मॅनेजमेंट अँड  ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट (एससीएमएचआरडी) च्या  संचालिका आहेत.  त्यांनी सिंबायोसिस  इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (एसआयआयबी) च्या  संचालिका म्हणूनही काम केले आहे. ‘एससीएमएचआरडी’मध्येही त्या २००७ ते २०१३ या कालावधीत पूर्णवेळ कार्यरत होत्या.  हिरो कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, ओआरजी- एमएआरजी  आणि आयएमआरएस इंडिया लि. फॉर रिसर्च आदी संस्थांशीही त्या  संलग्न आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link