Next
‘बोट क्लब’तर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, May 24, 2018 | 11:50 AM
15 0 0
Share this article:



पुणे : एकोणीसाव्या शतकात सुरू झालेला द रॉयल कनॉट बोट क्लब यावर्षी वैभवशाली यशस्वी १५० वर्षे पूर्ण करत  आहे. त्यानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. द रॉयल कनॉट बोट क्लबतर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत टेनिस, रोईंग आणि जलतरण या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना क्लबच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष कुमार तन्ना म्हणाले की, ‘क्लबला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येत्या १८ ते २० मे २०१८ या कालावधीत ‘पीएमडीटीए’ मानांकन आरसीबीसी करंडक ब्राँझ सिरीज टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १२ वर्षांखालील मुले व मुली या गटात होईल; तसेच येत्या २५ ते २७ मे या कालावधीत सब-ज्युनियर आणि वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद रोईंग स्पर्धा होतील. याच कालावधीत राज्यस्तरीय इनडोअर रोईंग/मशिन रोईंग स्पर्धाही होणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात पहिल्यांदाच रोथॉन स्पर्धेचे आयोजन केले असून २७ मे रोजी होणाऱ्या या स्पर्धेत चार किलोमीटर मॅरेथॉन व एक किलोमीटर इनडोअर रोईंग हे क्रीडा प्रकार होतील.’

दरवर्षीप्रमाणे तीन जून रोजी ‘बोट क्लब’तर्फे वार्षिक जलतरण स्पर्धाही घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये २००हून अधिक मुले व मुले, पुरूष व महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. या क्रीडा स्पर्धांबरोबरच रॉयल कनॉट बोट क्लबच्या भावी प्रकल्पांची रूपरेषा क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण हेगडे यांनी जाहीर केली. अत्याधुनिक सुविधा असलेल्या क्रीडा संकुलाची नव्याने उभारणी करण्यात येणार असल्याचे हेगडे यांनी या वेळी नमूद केले.​​​
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search