Next
मराठी कलाकारांनी केले हवाई दलाचे कौतुक
त्यांनी काम चोख बजावले, आता आपली पाळी : सुबोध भावे
BOI
Thursday, February 28, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक बदल्याच्या अपेक्षेत असताना अवघ्या १२ दिवसांत आपल्या हवाई दलाने पाकिस्तानवर हल्ला करत त्यांचे दहशतवादी तळ उध्वस्त केले. या दमदार कारवाईमुळे संपूर्ण देशभरातून हवाई दलावर कौतुकाचा वर्षाव होत असताना, मराठी कलाकारांनीही ट्विट करत जवानांचे कौतुक केले आहे. 

अभिनेता सुबोध भावे, रितेश देशमुख, सिद्धार्थ चांदेकर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भारतीय वायू सेना दलाचे कौतुक करत त्यांना सलाम केला आहे. दरम्यान अभिनेता सुबोध भावे याने, ‘भारतीय हवाई दलाच्या कामगिरीबद्दल मला त्यांचे खूप कौतुक वाटत असून मी त्यांना मानाचा मूजरा करत आहे. जवानांनी आपले काम चोखपणे बजावले असून, आता आपली पाळी आहे. आपणही छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांमधून देशाची सेवा केली पाहिजे. किमान रहदारीचे नियम पाळणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे अशा साध्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आणि त्या आपण केल्या पाहिजेत’, असे त्याने म्हटले आहे. 

अशाच प्रकारचे संदेश लिहून प्रत्येकाने ट्विट करत हवाई दलातील जवानांना सलाम केला आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search