Next
‘जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाश्वत कौशल्य विकास महत्त्वाचा’
प्रेस रिलीज
Tuesday, August 01, 2017 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाश्वात कौशल्यविकास महत्त्वाचा आहे. तरुणांमध्ये करिअरची प्रगती चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी प्रत्येक टप्प्यावर कौशल्य विकास महत्त्वाचा आहे,’ असे मत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅ्ग्रिकल्चर’तर्फे दोन दिवसीय ‘स्किल कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मराठा चेंबरचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, उपाध्यक्ष अजय मेहता, दीपक करंदीकर, मानद सचिव ऋजुता जगताप आदी उपस्थित होते.

हर्डीकर म्हणाले, ‘सध्या कौशल्य विकासामध्ये आपला भर प्राथमिक पातळीच्या रोजगार क्षमतेसाठी आहे; मात्र उद्योगातील सर्व पातळीवरच्या रोजगारांसाठी सतत कौशल्य विकास गरजेचा आहे. त्यामुळे शाश्वजत कौशल्य विकास होण्यास मदत होईल. जागतिक स्पर्धेमध्ये रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. विशेष करून लघू व मध्यम उद्योगांनी यासाठी सज्ज राहणे महत्त्वाचे आहे. नवउद्योजकांमध्येदेखील उद्योगाशी निगडित कौशल्ये आत्मसात करण्याची तयारी हवी. जीएसटी लागू झाल्याच्या पार्श्वौभूमीवर प्रत्येक उद्योजकाला अकाउंटिंगचीदेखील माहिती हवी.’

डॉ. अनंत सरदेशमुख यांनी दोन दिवसांत झालेल्या विविध चर्चासत्रांचा आढावा घेतला व मराठा चेंबरच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search