Next
प्रिमिअम विभागात ओरिएंट इलेक्ट्रिक अव्वल स्थानावर
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 02:34 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ओरिएंट इलेक्ट्रिक या १.८ बिलियन अमेरिकन डॉलरच्या सीके बिर्ला ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने एका वर्षातच प्रमुख पंख्यांच्या विभागामध्ये १९ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंतच्या मार्केट शेअरमधील वाढीची नोंद केली आहे. कंपनीने आपल्या प्रमुख ऐरो सिरीज पंख्यांच्या रेंजमध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान असलेल्या नवीन व्हेरिएंट्स दाखलीकरणानंतर विभागामध्ये १५० टक्क्यांनी प्रगती केली आहे. प्रमुख विभागामध्ये चार हजार रुपयांहून अधिक किंमत असलेल्या पंख्यांचा समावेश आहे.

अतुल जैनओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडच्या फॅन्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख अतुल जैन म्हणाले, ‘प्रमुख विभागामधील आमच्या ऐरो सिरीज फॅन्स रेंजला भव्य यश मिळाले आहे आणि ही प्रगतीदायी आकडेवारी भारतीय ग्राहकांमध्ये उत्तम जीवनशैली असण्याच्या इच्छेला दाखवते. पंखा चालू असताना आवाज न येणे, अधिक प्रमाणात हवेचे प्रसरण आणि आकर्षक डिझाइनचे पंखे अशा ग्राहकांच्या मागण्यांच्या आधारावर आमच्या डिझाइन इंजिनीअर्सनी ऐरोनॉटिकल संकल्पनांचा उपयोग करत ऐरो सिरीज फॅन्सची ही अभूतपूर्व रेंज तयार केली आहे. या रेंजची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अधिक प्रमाणात हवेचे प्रसरण, पंखा चालू असताना आवाज येत नाही आणि आकर्षक डिझाइन. या पंख्यांमध्ये एबीएस ब्लेड्ससह ऐरोफॉईल ब्लेड डिझाइन आहे; तसेच या पंख्यांमध्ये विंगलेट तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान ३०० सीएमएमपर्यंत अधिक प्रमाणात हवेचे प्रसरण होण्याची खात्री देते आणि या पंख्यांचे लुक्स देखील आकर्षक आहेत.’

ओरिएंट इलेक्ट्रिक ही भारतातील पंख्यांची सर्वात मोठी उत्पादक व निर्यातदार कंपनी आहे. या कंपनीचा निर्यातीमध्ये ६० टक्क्यांहून अधिक शेअर आहे आणि ही कंपनी ३५हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपस्थित आहे. ब्रॅंडची स्थानिक पातळीवरील लहान शहरांमध्ये देखील उपस्थिती असून देशभरात तीन हजार ५००हून अधिक डिलर्स, एक लाख रिटेल आऊटलेट्ससह वितरण नेटवर्क आहे; तसेच ब्रॅंडचे ३००हून अधिक शहरांमध्ये प्रबळ सर्व्हिस नेटवर्क आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link