Next
रिलायन्स बिग टीव्हीची विनामूल्य मनोरंजन सेवा
प्रेस रिलीज
Saturday, March 03 | 11:49 AM
15 0 0
Share this story

मुंबई : माननीय पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाशी सुसंगत अशी ऑफर ‘रिलायन्स बिग टीव्ही’ने सादर केली आहे. या अंतर्गत एकशे ३० कोटी भारतीयांना एचडी दर्जाच्या मनोरंजन वाहिन्यांची व्यापक श्रेणी विनामूल्य पाहता येणार आहे. भारतात प्रथमच एचडी वाहिन्यांसह अनेक पे वाहिन्या एक वर्षासाठी संपूर्णपणे मोफत आणि पाचशेपर्यंत एफटीए वाहिन्या पाच वर्षांसाठी मोफत मिळणार आहेत.

ग्राहकांच्या सोयीसाठी, सर्वांना दर्जेदार कार्यक्रमांचा अनुभव देण्यासाठी, चांगल्या डिजिटल दर्जासाठी आणि माफक दरातील सेवांसाठी अत्याधुनिक एचडी एचव्हीसी उपकरणाच्या मदतीने, रिलायन्स बिग टीव्ही देशात नेटवर्क व्यापक करण्यावर भर देत आहे. रिलायन्स बिग टीव्हीच्या एचडी एचइव्हीसी सेट टॉप बॉक्समध्ये शेड्यूल रेकॉर्डिंग, यूएसबी पोर्ट, यूट्यूब, रेकॉर्डिंग आणि एकाच वेळी एकापेक्षा जास्त वाहिन्या पाहणे आदी अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
या मर्यादित अवधीच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि उत्तम दर्जाचे मनोरंजन प्राप्त करण्यासाठी उपयोगकर्त्यांना www.reliancedigitaltv.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.

रिलायन्स बिग टीव्हीचे संचालक विजेंदर सिंह म्हणाले, “आजवर भारतीयांना आपल्या टीव्ही सेटवर ज्या पद्धतीने मनोरंजन मिळत होते, ते प्राप्त करण्याच्या बाबतीत एक नवी सुरुवात रिलायन्स बिग टीव्ही करत आहे. रिलायन्स बिग टीव्हीच्या ऑफरमुळे टीव्हीवरील मनोरंजन प्रभावीरित्या निःशुल्क प्राप्त होणार आहे. आधुनिक एचडी एचव्हीसी सेट टॉप बॉक्ससह, आता प्रत्येक भारतीय घरात उच्च दर्जाचे घरगुती मनोरंजन आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शैक्षणिक मजकूर प्राप्त होऊ शकेल.”
एका संयुक्त उपभोक्ता ऑफरद्वारे मनोरंजन आणि शिक्षणासाठी शहरी आणि ग्रामीण भारतास एकाच मंचावर आणून, डिजिटल इंडिया उपक्रमाला हातभार लावत असल्याचा दावा त्यांनी केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link