Next
प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची जयंती साजरी
BOI
Friday, June 28, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
दिवंगत लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची जयंती विविध उपक्रमांनी सोलापुरात साजरी करण्यात आली. जनसेवा संघटनेच्या वतीने इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा बक्षीस वितरण समारंभ व ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अकलूज (ता. माळशिरस) येथील धवल श्रीराम मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला. 

बक्षीस वितरण सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, डॉ. एम. के. इनामदार, पद्मजादेवी मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ‘माजी मंत्री, लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येकाच्या हृदयात नाव कोरले होते. त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात भरीव काम करून जातीपातीच्या पलीकडे माणसे जोडली होती. राजकारणविरहित कामासाठी त्यांनी जनसेवा संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्तृत्वान युवक व नेतृत्व घडविले. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर आली होती,’ असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. 

प्रारंभी प्रतिमा पूजन डॉ. राजेंद्र भारूड, मानसिंग भोसले, मेनकाताई फाळके, आदित्यराजे घुले, सौ. धनश्री घुले, पत्रकार मंदार फणसे आदींच्या हस्ते करण्यात आले. 

विजेत्या शॉर्ट फिल्म पुढीलप्रमाणे – 
इंटरनॅशनल विभाग : आर यू व्हॉलीबॉल (इराण), मॉनेटर्स आर सच (पोलंड), विल्डरनेस (यूएसए). 
नॅशनल विभाग : पॅप्लेट, अंत्येष्टी, द वेटिंग. 
मोबाइल कॅटेगरी : लास्ट कलेक्शन (प. बंगाल) 

या महोत्सवात ५५३ शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी १०० फिल्म्स या महोत्सवात दाखविण्यात आल्या. अझर फरमारजी (इराण), अनमोल कोठाडिया, अमर देवकर यांनी परीक्षण केले. या वेळी प्रतापसिंह मोहिते-पाटील जीवनगौरव पुरस्कार पुढील मान्यवरांना देण्यात आला. दिग्दर्शक, निर्माते दिवंगत दादासाहेब तोरणे, सुनील मुसळे (मेकअपमन, कोल्हापूर), प्रकाश शिंदे (कॅमेरामन, कोल्हापूर), सतीश बीडकर (कला दिग्दर्शक), कृष्णा चव्हाण (लाइटमन). 

विशेष वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. अनिकेत इनामदार यांचा व कलाक्षेत्रातील सेवेबद्दल शाहीर राजेंद्र कांबळे यांचा गौरव करण्यात आला. 

प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यासोबत ज्यांनी काम केले, अशा ज्येष्ठ सहकाऱ्यांचाही जनसेवा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संयोजक डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, मुग्धा कराडे, गायक जितेंद्र तुपे, प्रणाली साटम हे कलाकार सहभागी होते. त्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांना पोटधरून हसायला लावले. ‘एफएम’चे प्रसिद्ध निवेदक आर. जे. बंड्या यांनी खुमासदार सूत्रसंचलन करून कार्यक्रमात रंगत आणली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search