Next
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
प्रेस रिलीज
Friday, March 01, 2019 | 04:37 PM
15 1 0
Share this story



पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची उच्च रक्तदाब जागरूकता अभियानाअंतर्गत सर्वाधिक रुग्णांची अचूक रक्तदाब तपासणी केल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र मिलाल्यानिमित्त २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मेडिकल सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

२४ सप्टेंबर २०१८ रोजी जागतिक हृदय दिनानिमित्त ग्लेन मार्क फार्मस्युटीकल्स यांच्यातर्फे आयोजित उच्च रक्तदाब जागरूकता अभियानाअंतर्गत अचूक रक्तदाब तपासणी करण्यात आली. यात तब्बल ३०७ रुग्णांची रक्तदाब तपासणी एका तासात झाली. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. संपूर्ण भारतातील ३७ वैद्यकीय संस्थांचा यात समावेश होता. भारतात तब्बल ११ हजार ४१६ रुग्णांची अचूक रक्तदाब तपासणी करण्यात आली होती. यात डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने नवा विक्रम प्रस्थापित केला.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, ‘रचलेल्या या विक्रमाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अभिनंदन. या अभियानात मेडिसिन विभागप्रमुख डॉ. ए. एल. काकराणी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मानसी हराळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हॉस्पिटल जनहितार्थ कार्यरत आहे. राष्ट्रीय पातळीवर अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे पुढील कामाला प्रोत्साहन मिळाले आहे.’

या वेळी पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जी. पवार, विश्वस्त व खजिनदार डॉ.  यशराज पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर तसेच ग्लेन मार्क फार्मस्युटीकल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link