Next
‘महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागृती व्हावी’
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 06:18 PM
15 0 0
Share this story

युएसके फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. उषा काकडे
पुणे : ‘स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी. तसेच योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, हे अनेक महिलांना माहिती नाही. या विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात यावे, यासाठी कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी,’ असे मत युएसके फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. उषा काकडे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील युएसके फाउंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या ‘ऊर्जा फोरम’ प्रकल्पांतर्गत अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी या वस्तीपातळीवरील आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रशांती कॅन्सर केअर सेंटरच्या दिपाली चव्हाण व कविता राजपूत यांनी महिलांना स्तनाच्या कर्करोगाविषयी मार्गदर्शन केले.

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, तो कशामुळे होतो, कोणत्या स्थितीमध्ये तो अधिक धोकादायक असतो, योग्यवेळी निदान आणि उपचार यामुळे तो पूर्णतः बरा होतो, याविषयी महिलांनी जाणून घेतले. त्याचबरोबर गर्भाशयाच्या कॅन्सरबाबतही या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिलांची नावनोंदणी करून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. मार्गदर्शन व आरोग्य तपासणी केल्याबद्दल महिलांनी युएसके फाउंडेशन आणि प्रशांती कॅन्सर केअर सेंटरचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link