Next
व्हॅस्कॉन-हयात रिजन्सी गोल्फ चँपियनशिप
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 02:27 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड’ ही पुण्यात मुख्य कार्यालय असलेली सर्वात विश्वासार्ह आणि ख्यातनाम विकसक संस्था व ‘हयात रिजन्सी पुणे’ यांनी संयुक्तपणे १३ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅस्कॉन - हयात रिजन्सी चँपियनशिप २०१८’चे आयोजन केले होते. कॉर्पोरेट जगतातील ख्यातनाम व्यक्तींना गोल्फरची क्षमता (गोल्फिंग हँडिकॅप) चाचपता यावी यासाठी पूना गोल्फ कोर्स येथे आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत पुणे आणि मुंबईतील कॉर्पोरेट क्षेत्रातील ९०पेक्षा जास्त अग्रणी व्यक्तींनी सहभाग घेतला. 

व्हॅस्कॉन - हयात रिजन्सी चँपियनशिप २०१८, स्टेबलफोर्ड फॉरमॅटमध्ये खेळली गेली. आदित्य देशमुख (हँडिकॅप कॅटॅगरी ०-१५) आणि अजित सोमेश्वर (हँडिकॅप कॅटॅगरी १६-३०) यांनी पहिले स्थान पटकाविले, तर अनुज धोडी (हँडिकॅप कॅटॅगरी ०-१५) आणि रिम्पी मंजित सिंग (हँडिकॅप कॅटॅगरी १६-३०) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विजेत्यांचा संध्याकाळी झालेल्या शानदार सोहळ्यात ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय गोल्फ टूरसह सन्मान करण्यात आला. 

व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेडचे सीओओ सिध्दार्थ वासुदेवन म्हणाले, ‘गोल्फ हा अतिशय उत्साहवर्धक आणि गुंतवून ठेवणारा खेळ आहे आणि बऱ्याच काळापासून तो कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित आहे. या चँपियनशिपमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तींचा आणि आमचा संपर्क वाढून, त्यांच्याबरोबर आमचे दृढ नातेसंबंधदेखील तयार व्हावेत हाच यामागील आमचा हेतू आहे. या उपक्रमामुळे नेटवर्किंगची संधी तर उपलब्ध होतेच, शिवाय टीम स्पिरिटही वाढते. व्हॅस्कॉन - हयात रिजन्सी चँपियनशिप २०१८ला यंदा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही भविष्यातही अशा प्रकारच्या व्यासपीठांसाठी प्रयत्नशील राहू.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link