Next
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वर्षा मॅरेथॉन’चे आयोजन
BOI
Thursday, September 05, 2019 | 12:56 PM
15 0 0
Share this article:


कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून ‘वर्षा मॅरेथॉन’चे आयोजन केले जाते. यंदाही मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली. ४० स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. पुरुष स्पर्धकांमध्ये अभिषेक वाघमारे, तर महिला स्पर्धकांमध्ये प्रा. शीतल मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी स्पर्धकांना पदक देऊन गौरविण्यात आले. 


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे हजर होते. या वेळी सिंहगड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या डॉ. आयेशा सिद्दिकी, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, स्थावर अधिकारी पंकज जाधव, विभाग प्रमुख डॉ. विलास देवतारे, प्रा. निंबाळकर आदी मान्यवर हजर होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search