Next
पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक ऑनलाइन राष्ट्रीय स्पर्धा
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this storyपुणे :
पुण्यातील तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या व पर्यावरणविषयक जागृतीसाठी सातत्याने नवनवीन कल्पना राबवणाऱ्या संस्थेकडून गेली तीन वर्षे तेर ऑलिम्पियाड ही राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येते. या वर्षी या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, नोंदणी सुरू झाल्यापासून एका आठवड्यात ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावे नोंदवली आहेत. प्रत्यक्ष स्पर्धेला १६ ऑगस्ट २०१८पासून सुरुवात झाली असून, १६ सप्टेंबरपर्यंत ती स्पर्धा देता येणार आहे.

terregreenolympiad.com या संकेतस्थळावरून ही परीक्षा देता येणार आहे. १६ सप्टेंबर २०१८पर्यंत हे संकेतस्थळ २४ तास खुले राहील. ३० मिनिटांच्या वेळात विद्यार्थ्यांनी ५० प्रश्न सोडवायचे आहेत. या वर्षी स्पर्धा तीन गटांत होणार आहे. पाचवी ते नववीकरिता ‘रोप’ (Saplings), १०वी ते १२वी साठी ‘वनस्पती’ (Plants) आणि महाविद्यालयातील प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष या गटातील विद्यार्थ्यांसाठी ’झाड’ (Trees) अशा तीन गटांत स्पर्धेची विभागणी केली आहे. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येते. प्राथमिक फेरीमधून प्रत्येक गटातील पहिल्या १००० विद्यार्थ्यांना दुसऱ्या व अंतिम फेरीसाठी प्रवेश मिळेल. या फेरीत ‘रोप’ (Saplings) आणि ‘वनस्पती’ (Plants) या गटातील पहिल्या वीस विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड ड्राइव्ह, ३२ जीबी पेन ड्राइव्ह, वैज्ञानिक गणकयंत्र आणि इतर १००० विद्यार्थ्यांना तेर भेट अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल.

‘झाड’ (Trees) या गटातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी किंवा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची संधी देण्यात येईल. त्याचबरोबर शाळा, कॉलेजेससाठीही पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील भाग घेणाऱ्या तीन शाळांना अधिकतम विद्यार्थी सहभागासाठी स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले जाईल. त्या बत ग्रामीण क्षेत्रातील शाळांनाही उत्तम सहभागासाठी स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र दिले जाईल. प्रत्येक गटातील पहिल्या १००० विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातील.

‘राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेबद्दल खूप कुतूहल असून, गेली तीन वर्षे सातत्याने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. या वर्षी terregreenolympiad.com या संकेतस्थळावर नोंदणी सुरू झाल्यापासूनच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार हजार ५४८हून अधिक शाळांनी आणि ४६ हजार ५८४ हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. शिवाय या वर्षी तिसरा गट वाढवल्यामुळे तीन लाखांपर्यंत विद्यार्थी सहभागी होतील, असा विश्वास वाटतो,’ असे तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे म्हणाल्या. 

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एक महिन्यातील कोणत्या दिवसाच्या चोवीस तासांत कधीही परीक्षा देता येते. परीक्षेतील सहभागाचे प्रमाणपत्र लगेचच मिळते. परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक संकेतस्थळावरून घेतली जाणारी तेर ऑलिम्पियाड ही एकमेव परीक्षा आहे. टाटा मोटर्स व सिमेन्टेक या कंपन्यांच्या सामाजिक उपक्रमाचा भाग असलेल्या या परीक्षेत जास्तीत जास्त शाळांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आव्हान तेर संस्थेने केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :
वेबसाइट : 
terregreenolympiad.com
ई-मेल : terregreenolympiad@gmail.com 
मोबाइल : ९०९६००९१०४
व्हॉट्सअॅप : ९६७३८ ९१११३

(To read this news in English, please click here.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link