Next
एझ्रा जॅक किट्स
BOI
Sunday, March 11 | 03:45 AM
15 0 0
Share this story

पीटर नावाच्या एका काळ्या मुलाच्या भावविश्वातल्या अनेक गाजलेल्या बालकथा लिहून स्वतः त्यासाठी उत्तम रेखाटनं करणाऱ्या एझ्रा जॅक किट्स या लेखक-चित्रकाराचा ११ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......
११ मार्च १९१६ रोजी ब्रुकलीनमध्ये जन्मलेला एझ्रा जॅक किट्स हा बालकथाकार आणि बाळगोपाळांच्या पुस्तकांमध्ये छान छान चित्रं काढणारा ‘गिफ्टेड’ चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता. त्याचं बालपण अत्यंत हलाखीत गेलं होतं; पण त्याची चित्रकलेतली चमक त्याच्या बालपणापासूनच दिसत होती आणि अगदी लहानपणीच त्याने पेंटिंग्ज करून पैसे कमवायला सुरुवात केली होती. 

१९६० साली त्याने लिहिलेलं ‘माय डॉग इज लॉस्ट’ हे लहान मुलांसाठीचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि चांगलंच गाजलं. न्यूयॉर्कमध्ये नव्यानेच आलेला एका लहान स्पॅनिश मुलाचा कुत्रा हरवतो आणि त्याच्या शोधात असताना त्याला काही इटालियन, काही चायनीज आणि इतर गरीब मुलं भेटतात त्यांची कहाणी या पुस्तकात होती. या पुस्तकापासून त्याच्या पुढच्या अनेक पुस्तकांतून त्याने गरीब आणि अल्पसंख्याक मुलांचं भावविश्व चितारलं होतं. 

पीटर नावाच्या एक लहान निग्रो (ब्लॅक) मुलाभोवती त्याने बऱ्याच कथा रचल्या आणि पुस्तकांसाठी स्वतःच रेखाटनं केली. ‘द स्नोई डे’पासून सुरुवात होऊन ‘ए व्हिसल फॉर विली’, ‘ए लेटर टू अॅमी’, ‘हाय कॅट’, ‘गॉगल्स’, ‘पीटर्स चेअर’ आणि ‘पेट शो’ अशी ती सर्वच पुस्तकं बच्चेकंपनीला आवडून गेली. ‘दी स्नोई डे’साठी त्याला प्रतिष्ठेचं ‘कॅल्डेकॉट पदक’ मिळालं होतं. 

त्याने जवळपास २२ पुस्तकं लिहिली आणि ८५ पुस्तकांसाठी रेखाटनं केली होती.

सहा मे १९८३ रोजी त्याचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link