Next
शेअर बाजारात तेजी; ‘हे’ शेअर्स फायद्याचे!
BOI
Sunday, July 29, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात सध्या तेजीचा झंझावात दिसत आहे, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गृहवित्त कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य आहेत. त्यासह अन्य काही शेअर्सबद्दल अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
.....
शुक्रवारी (२७ जुलै २०१८) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३७ हजार ३३६वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार २७८वर स्थिरावलेले दिसले. गृहवित्त कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत. दिवाण हाउसिंग फायनान्स कंपनीचा शेअर ६२६ रुपयांवर पोहोचला आहे. रेप्को हाउसिंग कंपनीचा शेअर ६२८ रुपयांवर गेला आहे, तर इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सचा शेअर १३१० रुपयाला मिळत आहे.

येस बँकेचे एकूण उत्पन्न जून २०१७ तिमाहीशी तुलना करता ४३ टक्क्यांनी वाढून ८२७२.१८ कोटी रुपये झाले आहे. त्यात कर्जावर मिळालेले व्याज सहा हजार ५७८ कोटी रुपये आहे. अनार्जित कर्जासाठी ६२५.६५ कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर नक्त नफा ३०.५ टक्क्यांनी वाढून १२६०.३६ कोटी रुपये झाला आहे. बँकेचे भागभांडवल ४६१.१४ कोटी रुपये आहे. शेअरवरील उपार्जन ५.४७ रुपये आहे. जून २०१७साठी ते ४.२२ रुपये होते. बँकेच्या ठेवीत ४२ टक्के वाढ आहे. तिच्या बचत व चालू खात्यातील ठेवी ३५.१ टक्के आहेत. तिची ढोबळ व नक्त अनार्जित कर्जे अनुक्रमे १.३१ टक्के व ०.५९ टक्के इतकी कमी आहेत. तिच्या प्रथम प्रतीच्या (Tier I) भांडवलाची टक्केवारी १७.३ टक्के आहे. देशभर तिच्या ११०५ शाखा व १७५०हून अधिक एटीएम्स आहेत. येस बँकेचे मार्च २०१९ व मार्च २०२०चे नक्त उत्पन्न अनुक्रमे १६,४२५ कोटी रुपये व २०,८०० कोटी रुपये व्हावे. करोत्तर नफा अनुक्रमे पाच हजार ३४० कोटी रुपये व सात हजार २०० कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन या दोन वर्षासाठी २३.२५ रुपये व ३१ रुपये दिसेल. येस बँक ही खासगी क्षेत्रातील बँक गुंतवणुकीसाठी चांगली असली, तरीही मुद्दाम इथे जोखीम न घेता अन्य क्षेत्रातील कंपन्यांकडे विशेषतः गृहवित्त कंपन्यांकडे लक्ष द्यावे. 

आणखी एका कंपनीचा विचार करायचा झाल्यास ‘केईसी इंटरनॅशनल’चा विचार करावा. विद्युत पारेषण व वितरण या क्षेत्रात ही काम करते. तिला रेल्वेच्याही ऑर्डर्स मिळतात. तिच्याकडे सध्या १७ हजार ३०० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. २०१७- १८ वर्षामध्ये तिची विक्री १० हजार ५८ कोटी रुपये झाली होती. मार्च २०१९ व मार्च २०२० या वर्षासाठी तिची संभाव्य विक्री ११ हजार ९०० कोटी रुपये व १३ हजार ३५० कोटी रुपये व्हावी. मार्च २०१८ वर्षासाठी तिचा ढोबळ नफा एक हजार सहा कोटी रुपये होता आणि पुढील दोन वर्षासाठी तो अनुक्रमे ६०० कोटी रुपये व ७२० कोटी रुपये व्हावा. तिचे भागभांडवल ५१.४ कोटी रुपये आहे. मार्च २०१७ व मार्च २०१८ साठी तिचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे ११.९ रुपये व १७.९ रुपये होते.  

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link