Next
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे...
अरुणिमा सिन्हा ठरली माउंट विन्सन शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला
BOI
Monday, January 07, 2019 | 05:12 PM
15 1 0
Share this article:


लखनौ : माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केलेल्या जगातील पहिल्या अपंग महिला अरुणिमा सिन्हा यांनी नुकताच माउंट विन्सन या अंटार्क्टिकामधील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला आहे. असा पराक्रम गाजवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

अरुणिमा सिन्हा२३ वर्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलिबॉलपटू आणि उत्तर प्रदेशच्या रहिवासी असलेल्या अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनौहून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी त्यांना चालत्या रेल्वेतून बाहेर फेकले. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या अरुणिमा यांना आपला एक पाय गमवावा लागला. त्यानंतर अर्थात त्यांची व्हॉलिबॉलची कारकीर्द संपुष्टात आली. परंतु या सगळ्या घटनाक्रमांमध्ये अरुणिमा यांनी आपले मनोधैर्य गमावले नाही. कृत्रिम पाय बसवून त्यांनी माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर सर करून दाखवण्याचे निश्चित केले. 

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बचेंद्री पाल यांची त्यांनी भेट घेतली. अरुणिमा यांची जिद्द पाहून पाल यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना प्रशिक्षण दिले. अखेर २१ मे २०१३ला अरुणिमा या पृथ्वीवरील सर्वांत उंच जागी म्हणजेच माउंट एव्हरेस्टवर उभ्या होत्या.   

अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन हे सर्वोच्च शिखर सर करण्यात यश आल्याचे त्यांनी नुकतेच ट्विटरवरून जाहीर केले. अरुणिमा यांनी आणखी एक नवा जागतिक विक्रम स्वतःच्या नावे केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search