Next
आर. आर. पाटील फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
प्रेस रिलीज
Wednesday, February 20, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:

औरंगाबाद : शिवजयंतीचे औचित्य साधून आर. आर पाटील फाउंडेशनच्या वतीने १९ फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील शहीद जवान सोमनाथ भीमराव जाधव यांच्या गाजगाव येथील स्मारकावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून अभिवादन केले; त्यानंतर औरंगाबाद शहरातील सर्व पुतळ्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील ३७ पुतळ्यांवर दिवसभरात पुष्पवृष्टी करण्यात आली.

या वेळी आमदार प्रशांत बंब व गंगापूर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता क्रांती चौकात पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुपारी १२.३० वाजता हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार सतीश चव्हाण, आयोजक विनोद पाटील, अभिजित देशमुख, राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

‘औरंगाबाद शहरातील सर्व पुतळ्यांसह संपूर्ण ३७ पुतळ्यांवर दिवसभरात पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पुष्पवृष्टी होताना गावोगावी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. तांत्रिक कारणाने हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने २५ गावांत पुष्पवृष्टी होऊ शकली नाही, त्यामुळे या सर्व ठिकाणी २० फेब्रुवारीला सकाळच्या वेळेत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली गेली,’ असे आयोजक विनोद पाटील यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search